टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उद्या सोमवार दि.30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिर व दमा फुफ्फुसाची स्पायरोमॅट्रिक मशीनद्वारे मोफत तपासणी आयोजित करण्यात आले आहे.
दमा, टीबी व फुफ्फुस तज्ञ डॉ.सीमा इंगोले-पाटील या शिबिरात तपासणी करणार आहेत.
दमा व अलर्जी, जुनाट सर्दी व खोकला, क्षयरोग (टीबी) फुफ्फुस, गर्भाशयाची पिशवी, निमोनिया, मणक्याचा व मेंदूचा टीबी, मानेवरील व पोटातील टीबीच्या गाठी, झोपेत श्वास बंद होणे, बाल दमा व लहान मुलांच्या फुफ्फुसाच्या समस्या, कोरोना व कोरोनानंतर उद्भवणाऱ्या फुप्फुसाच्या समस्या,
झोपेचे विकार-झोपेत जास्त घोरणे, धूप्रपानामुळे होणारे श्वासविकार, अंतर कौशिय फुफ्फुस विकार (ILD) आदी आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे.
दमा व फुफ्फुस रोग निदान शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज