टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळच्या ग्रामसमेत विधवा पुर्नविवाह प्रथेस ग्रामसभेत मंजुरी देण्यात आल्याने त्याचबरोबर प्रथेमुळे मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता अनेक तरूणांना वेळेत आपले संसार उभे करण्यास मदत होणार आहे.
कोरोना सारख्या जगाला भेडसावणाऱ्या रोगामुळे अनेक विवाहित तरुणांना व तरूणींना आपले प्राण गमावावे लागले. त्यामुळे अनेक तरूण तरूणींना वैफल्याचे जीवन जगावे लागत आहे.
तसेच अपघात, दुर्गम आजार, कौटुंबिक भांडणे, घटस्फोट, अनिष्ठ हुंडा प्रथा या व अशा अनेक कारणाने तरूण तरूणींचे वैवाहित जीवन अल्पवयामध्ये संपुष्टात येते व त्यांना जीवनभर वैफल्याचे जीवन जगावे लागत असल्याचे समाजामध्ये दृश्य दिसून येते.
यावर उपाय म्हणून कमी वयातील विधवा महिला व पुरुषांचा पुर्नविवाह करण्यास सर्व समाजातून जागृती होवून पुर्नविवाह या प्रथेस समाजातून मंजुरी दिल्यास कौटुंबिक व सामाजिक स्थिरता निर्माण होवू शकेल.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १८६४ साली पुण्यातील नातू बागेत एका विधवेचा पहिला पुर्नविवाह घडवून आणलेला होता. तसेच फुले दाम्पत्यानी तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक विधवांचे पुर्नविवाह लावून समाजामधील विधवा व विधूरांचे संसार उभे केले होते.
हीच सामाजिक बांधिलकी आज आपल्या समाजातून जपल्यास समाजातील दोन टक्के तरूणांना विवाहाची संधी मिळणार आहे. तसेच विधूर पुरूषांना देखील या प्रथेमुळे लाभ होणार आहे.
गेल्याच महिन्यात मोहोळ येथील काही अविवाहित तरुणांनी नवरदेवाच्या बाशिंग मंडवळया बांधून नवरदेवाच्या वेशामध्ये घोडयावर बसून बँजोसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याचे
उदाहरण आहे असे प्रतिपादन पाठखळ येथील ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते भिमराव मोरे व त्यांच्या सुविद्यपत्नी पंचायत समितीच्या माजी सदस्या अंजली मोरे यांनी हा विषय मांडला.
या विषयास सर्व ग्रामस्थांनी आवाजी एकमताने मंजूरी दिली. त्यामुळे पाठखळ गावच्या ग्रामपंचायतीचे तसेच नवनिर्वाचित सरपंच ऋतुराज बिले, ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज