मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे मुंबईतील घाटकोपर भागात अडकलेल्या एका अतिउत्साही जावयाने चक्क रात्री-बेरात्री लपतछपत पोलिसांचा डोळा चुकवत अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन हा सासुरवाडीचा गाव गाठला खरा. पण सासरवाडीत पोहोचल्यानंतर तीनच दिवसात त्याचा कोरूनाने मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत काहीच माहीत नसणाऱ्या सासुरवाडीतील लोकांचे जीव टांगणीला लागले आहेत.घाटकोपरला नोकरीला असलेले एक जावईबापू लॉकडाऊनला वैतागून आणि बायकोला भेटण्यासाठी थेट घाटकोपर ते पारनेर असा पायी प्रवास करून आले. इतक्या लांबून जावईबापू आले म्हणून त्यांचे सासरवाडीत जंगी स्वागत झाले.
त्यास लक्षणे संशयास्पद आढळल्याने त्या डॉक्टरने तरूणास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्मिता म्हस्के यांनी त्यास नगर येथे जिल्हा रूग्णालयात जाण्यास सांगितले.
त्यांनीच १०८ रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तरूणाने स्वतः नगर येथे जाऊन उपचार घेतो, असे सांगत तो पुन्हा पिंपरी जलसेन येथे आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास झाल्याने त्यास नगरला नेण्यात येत होते. मात्र, प्रवासात त्याचा मृत्यू झाला.
——————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज