mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बेकायदा जमिनीचे तुकडे करून एक-दोन गुंठे जमिनीची विक्री करण्याचे प्रकार आता बंद होणार; प्लॉटिंगची दस्तनोंदणी बंद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 15, 2021
in राज्य
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणांची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य लेआऊटमधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होणार आहे. याबाबत परिपत्रक नोंदणी व मुद्रांक विभागाने काढले आहे.

या निर्णयामुळे बेकायदा जमिनीचे तुकडे करून एक-दोन गुंठे जमिनीची विक्री करण्याचे प्रकार बंद होणार आहेत.

– आजच भेट द्या:

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये जुना मोबाईल घेऊन या नवीन स्मार्टफोन घेऊन जावा; एक्स्चेंज मिळाव्यास सुरुवात

गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे.

तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्तनोंदणीदेखील होत आहे. मध्यंतरी राज्य सरकारने यासंदर्भात चौकशीचे आदेश नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दिले होते.

या चौकशीतदेखील असे अनेक प्रकार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा दस्तांची नोंदणी करण्याचे बंद केले होते.

यासंदर्भात राज्य सरकारकडे तक्रारी झाल्या. त्यावर राज्य सरकारच्या महसूल विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला पत्र पाठवून कायद्यातील तरतूदी काय आहेत, हे पुन्हा एकदा कळविले आहे.

त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून अथवा सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या लेआऊटमधील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारातील दस्तांची नोंदणी करता येईल, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याबाबत परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

अशी आहे तरतूद व नियम

एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील तुम्ही दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल, तर त्यांची दस्त नोंदणी होणार नाही.

मात्र, त्याच सर्व्हे नंबरचा लेआऊट करून त्यामध्ये दोन गुंठ्यांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल, तर अशा मान्य लेआऊटमधील दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी होऊ शकणार आहे.

राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तुकडाबंदीचे नियम वेगवेगळे आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात दहा गुंठ्यांच्या आतील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या दस्तांची नोंदणी होऊ शकत नाही. मात्र, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या परंतु स्वतंत्र सातबारा उतारा असलेल्या जमिनींची व्यवहाराची नोंदणी होऊ शकते.

…अन्यथा प्रशासकीय कार्यवाही

सर्व दुय्यम निबंधक यांनी या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे व दस्त नोंदणी करताना अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशाप्रकारे दस्त नोंदणी करताना अनियमितता केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. – श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुंठेवारी बांधकामप्लॉटिंग

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

May 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
Next Post
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

विद्यार्थ्यांनो! नॉन क्रिमिलेअरसाठी शेतीसह नोकरीच्या उत्पन्नाची अट रद्द; काय आहे निर्णय वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा