मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सुरु झाली आहे. आरबीआयकडून 6 जून रोजी पतधोरण जाहीर केलं जाईल. या बैठकीत रेपो रेट किती घटवला जाणार याची घोषणा करण्यात येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरणाच्या बैठकीनंतर रेपो रेट संदर्भात घोषणा करण्यात येते.
आरबीआय यावेळी 0.50 टक्क्यांनी किंवा 50 बेसिस पॉईंटनी कमी करु शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँक रिसर्च रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे. कर्जाच्या चक्राला गती देणे आणि सध्याच्या आर्थिक अनिश्चिततांचा परिणाम कमी करण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पतधोरणविषयक समितीची बैठक
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 4 जून ते 6 जून दरम्यान सुरु राहील. या बैठकीत जे निर्णय घेतले जातील त्याची घोषणा 6 जून रोजी करण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट 0.50 टक्क्यांनी घटवण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोनवेळा रेपो रेटमध्ये कपात
शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर असताना रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता. मात्र, आरबीआयचे गव्हर्नर बनल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी दोनवेळा रेपो रेट घटवला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये दोन्ही वेळा प्रत्येकी 0.25 टक्के रेपो रेट घटवण्यात आला आहे. सध्या रेपो रेट 6 टक्क्यांवर आहे. आरबीआय तिसऱ्यांदा दिलासा देणार का हे पाहावं लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये रेपो रेट मधील कपातीचा जो अंदाज वर्तवण्यात आला आहे. तो अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. गेल्या काही दिवसात अर्थतज्ज्ञांनी देशातील महागाई दर 4 टक्क्यांपेक्षा कमी असल्यानं 25 बेसिस पॉइंटची कपात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांना ज्या दरानं कर्ज देते तो दर होय. त्यानंतर बँका रेपो रेटच्या आधारे खातेदारांना कर्ज पुरवठा करतात. रेपो रेट पेक्षा कर्जाचा व्याज दर अधिक असतो. जर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला तर बँका देखील त्यांच्या कर्जांचे व्याज दर घटवतात.
त्यामुळं ज्यांनी फ्लोटिंग व्याजदर पर्याय निवडून कर्ज घेतलं असेल त्यांच्या कर्जाचे ईएमआय कमी होतील. रेपो रेट 0.50 टक्क्यांनी घटल्यास गृह खरेदीसाठीच्या कर्जाचं व्याज कमी होईल. याशिवाय वाहन कर्जाच्या व्याजात देखील कपात होऊ शकते. रेपो रेट संदर्भातील घोषणा आता 6 जूनला होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज