mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली; ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून केली खतरनाक युक्ती…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2025
in क्राईम, राष्ट्रीय
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

गेल्या काही दिवसांपासून बँका आणि बँक व्यवस्थापकांकडून सामान्य लोकांशी होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अशातच एका घटनेत राजस्थानमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजरने फसवणूक करून ग्राहकांच्या खात्यातून ४ कोटी ५८ लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पैसे काढण्यापूर्वी बँक मॅनेजर ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलत असे. मात्र तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आणि मॅनेजरने हा सगळा घोटाळा केल्याचे समोर आलं. त्यानंतर महिला बँक मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

राजस्थानातील कोटा येथील आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजर साक्षी गुप्ता हिने ग्राहकांच्या खात्यातून फसवणूक करून ४ कोटी ५८ लाख रुपये काढले. साक्षी गुप्ता हे पैसे शेअर बाजारात गुंतवत होती.

ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून…

या ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून ती पैसे काढण्यापूर्वी ग्राहकांचे मोबाईल नंबर देखील बदलत होती. आरोपी साक्षीने तिच्या कुटुंबाचे लाखो रुपयेसुद्धा शेअर बाजारात गुंतवले होते.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर साक्षी गुप्ताला अटक झाली. पोलिसांच्या तपासात साक्षी गुप्ताने अडीच वर्षांत ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून पैसे काढल्याचे समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी गुप्ताने २०२० ते २०२३ या कालावधीत बँक खात्यांमधून पैसे काढले. त्या काळात बँकेच्या एका ग्राहकाने १.५० लाख रुपयांच्या एफडीची माहिती मागितली होती. तसेच १५ फेब्रुवारी २०२३ रोजी बँकेच्या एका ज्येष्ठ महिला ग्राहकाच्या खात्यातून ३ कोटी २२ लाख रुपये काढण्यात आले होते. ती तक्रार करण्यासाठी बँकेतही आली. यानंतर बँकेने चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान,अधिकाऱ्यांना साक्षी गुप्तावर संशय आला. साक्षी गुप्ताने ग्राहकाच्या सूचनांशिवाय ही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. तिने ते खाते ‘पूल अकाउंट’ म्हणून वापरले होते.

३१ ग्राहकांच्या एफडी वेळेच्या आधीच बंद करताना साक्षीने १ कोटी ३४ लाख ९० हजार २५४ रुपये तिच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तिने ३ लाख ४० हजार रुपयांचे वैयक्तिक कर्जही फसवणूक करुन मंजूर करुन घेतले.

साक्षीने काही ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलले आणि त्याच्या जागी तिच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर टाकले. त्यामुळे पैसे वळवताना ओटीपी आणि अलर्ट मेसेज खऱ्या ग्राहकांकडे गेलेच नाहीत.

बहुतेक ट्रान्झॅक्शन इंस्टा किओस्क आणि डिजिटल बँकिंग चॅनेलद्वारे केले गेले. साक्षीने चार ग्राहकांच्या डेबिट कार्डचा वापर करून एटीएम आणि इंटरनेट बँकिंगद्वारेही व्यवहार केले. तिने तिच्या डीमॅट खात्यांमध्ये बेकायदेशीर पैसे देखील पाठवले. यासोबत साक्षी गुप्ताने तिच्या वडिलांचे ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले होते.

तिने कुटुंबातील इतर अनेक सदस्यांच्या खात्यांमधून पैसे घेऊन ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले होते. मात्र घरच्यांना याचा पत्ताच नव्हता. साक्षी कॉम्प्युटरवरुन मोबाईल नंबरचा ओटीपी बदलत होती, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवर मेसेज जात नव्हते.

तक्रारीनंतर साक्षी गुप्ताला ३१ मे रोजी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तिने सांगितले की, मी बँक ग्राहकांना मोबाईल नंबर बदलण्यासाठी फॉर्म भरायला लावला आणि त्यात माझ्या कुटुंबाचे नंबर टाकले, जेणेकरून पैसे काढल्याचा मेसेज खातेदारापर्यंत पोहचणार नाही.

मी खातेदाराच्या खात्यातून पैसे काढले आणि ते स्वतःच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. दुसरीकडे, या संपूर्ण फसवणुकीत तिच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी होते? याचा तपास सुरू आहे.

घोटाळा समोर कसा आला?

बँकेच्या एका ज्येष्ठ महिला ग्राहकाच्या खात्यातून ३ कोटी २२ लाख रुपये काढण्यात आले. ती तक्रार करण्यासाठी बँकेतही आली. यानंतर हे प्रकरण समोर आले. साक्षी ग्राहकाच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करत असे. तिने त्या खात्याचा वापर पूल अकाउंट म्हणून केला होता.

असा केला घोटाळा

साक्षीने ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलले. त्यामुळे ओटीपी आले नाहीत. तीने फिक्स डिपॉझिटसमध्ये फेरफार करून हा घोटाळा केला. तिने एका व्यक्तीच्या नावावर ३.४ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि एटीएम, इंटरनेट बँकिंग, तसेच चार ग्राहकांचे डेबिट कार्ड वापरून व्यवहार केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बँक खाते फसवणूक

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

काय सांगता..! फक्त ‘इतक्या’ रुपयांचा चेक बाऊन्स झाला तरी तुरुंगवास? जाणून घ्या काय आहे कायदा…

June 17, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा… भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

June 17, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
दिराने केला भावजयीचा विनयभंग तीघांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात विवाहित महिलेचा विनयभंग; धर्मगावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

June 16, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री थरार! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

June 15, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

June 12, 2025
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 15, 2025
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही! बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

ताज्या बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?

June 17, 2025
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

काय सांगता..! फक्त ‘इतक्या’ रुपयांचा चेक बाऊन्स झाला तरी तुरुंगवास? जाणून घ्या काय आहे कायदा…

June 17, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा… भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

June 17, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा