मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गेल्या दहा वर्षापासून रिक्त असलेल्या मंगळवेढा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर दर्शन महावीर मेहता यांच्या नियुक्ती झाली आहे. त्यांनी २९ एप्रिल रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.
१० जुलै २०१६ पासून मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यावरच येथील शिक्षणाचा गाडा चालत होता. प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभिषण रणदिवे यांच्याकडून मेहता यांनी पदभार स्विकारल्यानंतर विविध शिक्षक संघटनांनी सत्कार केला.
मेहता हे सन २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तब्बल ४ वर्षानंतर नियुक्ती आदेश पुणे विभागातून मिळाला आहे. ते कॉम्प्युटर इंजिनिअर असून त्या सोबत एमबीएची डिग्री त्यांनी प्राप्त केली आहे.
सत्कारावेळी शिक्षक नेते सुरेश पवार, मरवडे केंद्र प्रमुख निवृत्ती सुर्यवंशी, राज्यसमन्वयक दिगंबर तोडकरी, विशाल जाधव,
सल्लागार सचिव दत्तात्रय सलगर, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, जुनी पेन्शन संघटनेचे दिगंबर कुचेकर, जेष्ठ शिक्षिका अमृता कुलकर्णी, व जि.प.चे अन्य शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज