टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका विवाहित तरुणाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.१ जानेवारी) उघडकीस आली. दरम्यान, विवाहित तरुणाला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, एका अल्पवयीन तरुणीची आरोपी तरुणासोबत सोशल मीडियातून ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत तरुणाने त्या मुलीशी जवळीक निर्माण केली.
शुक्रवारी सकाळी कॉलेजला गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली. सायंकाळी उशिरा ती मुलगी घरी आली व आपल्याला आरोपी तरुणाने घेऊन गेल्याचे सांगितले.
यामुळे मुलीच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाला फताटेवाडी येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
प्रवासात महिलेचे एक लाखाचे दागिने लंपास
सोलापूर : कार्यक्रमासाठी दागिने घेऊन गाडीतून प्रवास करत असताना महिलेची पर्स चोरट्याने लांबविली. चोरीला गेलेल्या पर्समध्ये एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी तेजस्वीनी राजकुमार बिराजदार (रा. नरेंद्र नगर, विजयपूर रोड) यांनी वळसंग पोलीस ठाण्याता फिर्याद दिली आहे. बिराजदार यांची वडगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे शेती आहे. शेतात बोअर मारल्याने पूजेचे साहित्य घेऊन तेजस्विनी यांना सासऱ्यांनी बोलवले. त्यामुळे तेजस्विनी यांनी अर्धा तोळे वजनाचे सहा अंगठ्या, अर्धा तोळे वजनाचे दोन लॉकेट आणि एक ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी, असे दागिने घेऊन दोन मुलांसह त्या एसटीत बसल्या. प्रवासात दागिने असलेली पर्स चोरीस गेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी वसूल केला 21 लाखांचा दंड
सोलापूर शहरातील कोरोनाला आवर घालण्याच्या हेतूने शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांसह बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यासाठी होमगार्डची मदत घेतली जात आहे. 17 ऑगस्टपासून पोलिसांनी शहरातील 20 हजार 847 विनामास्क फिरणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांकडून 20 लाख 91 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. शनिवारी (ता. 2) 231 नागरिकांकडून 23 हजार 100 रुपये दंड वसूल केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज