मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा पोलीस ठाण्यात आज सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तक्रार निवारण दिन असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी यापुढे प्रत्येक शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी प्रसार माध्यमांना दिली.
सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
सन २०२५ या वर्षात नव्याने प्रत्येक शनिवारी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार दिन आयोजित करण्यात आला असून
पहिला तक्रार दिन आज दि.४ जानेवारी रोजी मंगळवेढा पोलीस ठाणे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित केला असून २४८ अर्ज शुक्रवार अखेर प्राप्त झाले असल्याचे पो. नि.ढवाण यांनी सांगीतले.
ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांनी या पुढे तक्रारी सादर करुन तक्रारीचे निवारण करुन घ्यावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज