मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पिता जरी लेकीच्या जिवावर उठला तरी तिचे प्रेम तसूभरही कमी होत नसते. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना पंढरपूरच्या न्यायालयात घडली. मुलीसह जावयाचा काटा काढण्याच्या हेतूनं पिस्तूल घेऊन निघालेल्या पित्याला तीन महिन्यानंतर मुलीनं माफ केलं अन् त्याची कारागृहातून सुटका झाली.
घरच्या मंडळींचा विरोध झुगारून मुलीने परजातीच्या तरुणाशी प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या पित्याने मुलीसह जावयाचा काटा काढण्याचा डाव रचला. तो पिस्तूल घेऊन निघाला असता पोलिसांना मोटारीत बेकायदा पिस्तूल सापडले. त्याच्यासह इतर दोघांना अटक केली.
तपासादरम्यान पोटच्या मुलीसह जावयाला खल्लास करण्याचा डाव रचल्याचे निष्पन्न झाले. जामिनावर सुटण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला; परंतु पिता तुरुंगातून सुटून बाहेर आला तर मुलगी आणि जावई दोघांच्याही जीविताला धोका निर्माण होईल, असा आक्षेप सरकार पक्षाने घेतला होता.
दोन वेळा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, मुलीचे मन द्रवले. जावयानेदेखील साथ दिली. त्यासाठी न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यांना माफ करावे, पित्यापासून मला आणि माझ्या नवऱ्याच्या जीविताल कोणताही धोका नाही.
उलट, मी गरोदन असल्याने पित्याच्या आधाराची खर गरज आहे. त्यामुळे पित्याला जामिनावन सुटका करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे तिने शपथपत्रात नमूद केले परिणामी, तब्बल तीन महिन्यांनंतन पित्याची तुरुंगातून सुटका झाली पित्यातर्फे अॅड. धनंजय माने, अॅड जयदीप माने व इतर सहकारी वकील काम पाहत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज