मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी यांचेकडील पोलिस अधिकारी यांच्या वेगवेगळ्या पथकांनी अचानक बंद खोलीत चालू असलेल्या ऑनलाइन कसिनोवर छापा टाकून ११ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन दुचाकींसह,
जुगार साहित्य असा सुमारे ९ लाख ९५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास सांगोला येथील शिवाजी चौकातील धान्य बाजारात करण्यात आली.
सांगोला शहरातील भर वस्तीत असलेल्या शिवाजी चौकातील धान्य बाजार या ठिकाणी बेकायदेशीरपणे विनापरवाना ऑनलाइन कसिनो (लॉटरी) संगणकावर ऑनलाइन आकडे लावून लोकांना पैशाचे आमिष दाखवून
रुलेट जुगारावर पैसे घेऊन जुगार चालवीत असल्याची गोपनीय माहिती पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी वेगवेगळ्या पथकांद्वारे एकाच वेळी छापा टाकून कारवाई करण्यात आली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस.,
पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, वीरसेन पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती बैनवाड, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोज कुंभार, पोलिस नाईक ईलाही मुलाणी, पोलिस कॉन्स्टेबल गणेश पाटील, आयाज काझी, चालक पोलिस कॉन्स्टेबल रमेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल..
फिरोज सिकंदर मुल्ला (रा. मुजावर गल्ली, सांगोला) हा सदर ठिकाणी ऑनलाइन जुगार अड्डा चालवीत असल्याचे व अक्षय विजय इंगोले (रा मणेरी गल्ली, सांगोला), अनिल भारत जाधव (रा. जय भवानी चौक, सांगोला), राजन उदयसिंह देशमुख (रा. देशमुख गल्ली, सांगोला), सोहेल टायर खतीब व अस्लम जाफर मुलाणी (रा भोपळे रोड, सांगोला),
मोहसीन ईलाही खतीब व जैश रियाज मुजावर (रा. मुजावर गल्ली सांगोला), विशाल शिवाजी गायकवाड (रा. भीमनगर, सांगोला), ज्ञानेश्वर उर्फ माउली तानाजी गायकवाड (रा. सांगोला), विजयसिंह पांडुरंग मिसाळ (रा.पाचेगाव खुर्द ता सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज