टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक प्रशाला या दोन शाळांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी
नियुक्त केलेल्या पथकाने आज अचानक भेट देवून शिक्षक व विदयार्थी उपस्थिती व शाळेची गुणवत्ता तपासणी केली.
दरम्यान, या दोन्ही शाळेत शिक्षक व विदयार्थी यांची 100 टक्के उपस्थिती व दोन्ही शाळांची गुणवत्ता चांगली असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्याचे प्रसार माध्यमांना त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गैरहजर शिक्षकांवर कारवाई केली होती. तदनंतर जिल्हयातील सर्वच शाळेतील शिक्षकांची अचानक भेट देवून तपासणी करण्याचा निर्णय झाल्याने या अनुषंगाने मध्यान्ह भोजनावेळी दिलीप स्वामी यांनी नियुक्त केलेले पथक अचानक शाळेच्या आवारात दाखल झाले.
या पथकामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग-2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शाखा अभियंता मिलिंद किणीकर या दोन सदस्यीय पथकाने प्रथमतः जि.प.माचणूर शाळेला भेट दिली.
यावेळी शिक्षक उपस्थिती, विदयार्थी उपस्थिती, शाळा परिसरातील वृक्षारोपण, दशसुत्री कार्यक्रम अंमलबजावणी,मुलांची गुणवत्ता,शालेय पोषण आहार,स्टॉक रजिस्टर यांची तपासणी करण्यात आली.
त्याचबरोबर मुलांना काही प्रश्न विचारून त्यांच्या बुध्दीमत्तेची पडताळणी करण्यात आली.यावेळी शाळेतील तीन शिक्षक व सर्व विदयार्थी उपस्थित असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
पथकाने मुलांकडून गाणी व कविता म्हणवून घेतल्या. प्रभारी मुख्याध्यापिका सुजाता पुजारी, सरोजा वेदपाठक,कविराज दत्तू आदी शिक्षक उपस्थित होते.
पथकाने माचणूर ग्रामपंचायतीला भेट देवून तेथील कामकाजाचीही पाहणी केली.यावेळी ग्रामसेवक गोरख जगताप उपस्थित होते.
या पथकाने दुसरी भेट श्री सिध्देश्वर विदयामंदिरला दिली.येथील प्रशालेचे भव्य मैदान पाहिले. दुपारच्या सत्रामधील 8 वी ते 10 वी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारण्यात आले.विदयार्थ्यानी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी शाळेचा गुणात्मक दर्जा पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.पथकाने विदयार्थ्यांसमवेत विदयार्थी बनून त्यांचा गुणात्मक दर्जा तपासल्याने या पथकाला शालेय जीवनातील आठवणी जागृत झाल्याच्या भावना पथकाने प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केल्या.
यावेळी मुख्याध्यापक जयंत पवार, तानाजी खांडेकर, रमेश डोके, विदया घोडके, कैलास क्षीरसागर, सुरेश लवटे, मनोज वेदपाठक, बालाजी डोके आदी शिक्षक तर महेंद्र पुजारी, तानाजी हेगडे, संजय पाटील, संतोष कलुबर्मे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज