mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 17, 2026
in शैक्षणिक, सोलापूर
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

टीम मंगळवेढा टाईम्स । ​सांगोला : बाळासाहेब झिंजुरटे

केंद्रीय अथवा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून आपल्या आयुष्यातील ३० ते ४० वर्षे अत्यंत तळमळीने सेवा करून कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा गौरव व्हावा, याच उदात्त भावनेने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन किंवा सूर्योदय मॉल अशा सूर्योदय ग्रुपच्या प्रत्येक व्यवसायावर आपल्यासारख्या थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाची छत्रछाया आहे. याच आशीर्वादाच्या बळावर सूर्योदय ग्रुपची गगनभरारी सुरू आहे,” असे भावनिक उद्गार सूर्योदय परिवाराचे कुटुंबप्रमुख आणि एल. के. पी. मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केले.

​सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध शासकीय खात्यांमधून सेवानिवृत्त झालेल्या, तसेच नुकतीच पदोन्नती (प्रमोशन) मिळालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा सूर्योदय बँक्वेट हॉल, सांगोला येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

हाकेला धावून येणारे नाते: रक्ताची गरज भासली तरी सूर्योदय तत्पर

​अनिलभाऊ इंगवले पुढे म्हणाले की, “या सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांचे सूर्योदय परिवारासोबत एक भावनिक आणि अतूट नाते निर्माण झाले आहे. आगामी आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगी, अगदी रक्ताच्या बॉटलची जरी गरज भासली, तरी आम्ही आपल्या एका हाकेवर धावून येऊ.”

​पावणेदोनशे सत्कारमूर्तींचा ‘शाही सन्मान’

प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, ​सैन्यदलातील जवान, ​महसूल, पोलीस आणि आरोग्य विभाग, ​नगरपालिका व महावितरण (MSCB) ​अशा विविध खात्यांमधील वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या सुमारे पावणेदोनशे (१७५) अधिकारी व कर्मचारी बांधवांचा त्यांच्या परिवारासह गौरव करण्यात आला. प्रत्येक सत्कारमूर्तीला मानाचा फेटा, मायेची शाल आणि सन्मानचिन्ह देऊन शाही पद्धतीने सन्मानित करण्यात आले.

​प्रा.संभाजी यादव यांच्या ‘वैचारिक मेजवानी’ने रंगली सभा

कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे, राधानगरी (कोल्हापूर) येथील प्रसिद्ध विनोदी वक्ते प्रा. संभाजी यादव यांनी सुमारे दीड तास आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना खिळवून ठेवले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण हुबेहूब आवाज काढत आणि विनोदी प्रसंग सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व अत्यंत चिंतनीय मार्गदर्शन केले.

​यावेळी क्रीडा शिक्षक शहाजी घाडगे सर, मुख्याध्यापिका सौ. संगीता गायकवाड मॅडम, केंद्रप्रमुख हमजू मुलानी आणि सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

​मंचावर मान्यवरांची मांदियाळी

​या सोहळ्याला सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, एल. के. पी. मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ.अर्चनाताई इंगवले, व्हा. चेअरमन सौ. ज्योतीताई भगत, सूर्योदय परिवाराच्या संचालिका सौ. मीनाक्षीताई दिघे, सौ. सुरेखाताई लवटे आणि सूर्योदय परिवाराचे संचालक प्रशांत पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​स्मरणार्थ क्षण…

सूर्योदय समूहाने दिलेले आग्रहाचे निमंत्रण, प्रत्येकाची आस्थेने केलेली विचारपूस, शाही सन्मान आणि प्रा. यादव यांची वैचारिक मेजवानी यामुळे हा सोहळा आमच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील,” अशा कृतज्ञतापूर्वक भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या.

​कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन, सूर्योदय फाउंडेशन, सूर्योदय महिला अर्बन आणि एल. के. पी. मल्टीस्टेटच्या सर्व कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सूर्योदय परिवार

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; आज जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 14, 2026
Next Post
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात 'सिंघम' इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा