टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ सुरू होत आहे. सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल मॉडेल व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथे जिल्हा स्तरीय सेंद्रीय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, तालुका पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच रोहिणी जाघव, पोलिस दत्तात्रय जाधव, उपसरपंच आनंदा जाधव,
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम अधिकारी केंद्र प्रमुख उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कर्मवारी भाऊराव पाटील महाविद्यालय, ग्रामपंचायत सिध्दवाडी, कै. स्वाती जाधव महिला फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य सरपंच रोहिणी सारंग जाधव, संगिता गोडसे, बेबीनंदा गोडसे, आप्पा जाधव, रमेश बनसोडे, विजय जाधव, ग्रामसेवक महादेव भुसे यांनी परिश्रम घेतले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध
महिलांच्या सुरक्षितते साठी अॅप तयार करता आहोत. मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या. महिलांच्या सुरक्षितते साठी पोलिस प्रशासन कटीबध्द आहे. असेही पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. स्वागत रमांकात गायकवाड यांनी केले.
या प्रसंगी महिला बचतगटाचे सदस्याव मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना देशी भाजी पाला बियाणे चे वाटप पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते करणेत आले.
धूप थांबवण्यासाठी बांबू लागवड करा
यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, सिध्देवाडी गावात शेतकरी यांनी दोन गुंठे स्वतःसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्यास टीम तयार आहे. घरगुती स्तरावर परसबागांचे नियोजन करा. स्वतःचे घरासाठी भाजीपाला निर्माण करा.
सध्या युवकांचे माध्यमातून अन्न सुरक्षा व विषमुक्त शेतीचे चे प्रयोग प्रयोग र सुरू करा. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक शेतकरी यांनी स्वतःची किमान दोन गुंठे जमीन स्वतःच्या कुटुंबासाठी भाजीपाला व फुले फळे तयार करण्यासाठी ठेवा.
नदीकाठाची जमिनीची धूप थांबवण्यासाठी बांबू लागवड व वृक्षारोपण करा. नदीकाठी स्वच्छता मोहीम राबवा, पर्यावरण चांगले राहणे साठी देशी वृक्ष लावा. रोजगार हमी योजना व वनीकरण विभाग, ग्रामपंचायत एकत्रित कृती संगम करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज