टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी आयोजित केलेल्या तंत्र प्रदर्शन 2023 यामध्ये पार्वती ताड आयटीआय खोमनाळ रोड, मंगळवेढा यांची राज्यस्तरीय लेव्हलला निवड झाली.
सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या सूचनेनुसार शासकीय जिल्हा आय.टी.आय सोलापूर येथे आयोजित केलेल्या तंत्र प्रदर्शन स्पर्धेमध्ये एकूण 42 मॉडेल सहभागी झाले होते त्यापैकी नऊ मॉडेलचे जिल्हास्तरावरून महाराष्ट्र राज्य पुणे येथे भरणाऱ्या तंत्र प्रदर्शन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
तसेच पार्वती ताड आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये मेकॅनिक मोटर संदर्भात एअर ब्रेक असेंबली बनवली जे की मोठ्या अवजड वाहनांमध्ये ब्रेक लावण्यासाठी वापरतात. याचे डेमोस्ट्रेशन मॉडेल बनवले.
यामध्ये कॉलेजचे मेकॅनिक विभागातील विद्यार्थी सूहान काझी, संग्राम घोडके, रणजित वाडेकर, प्रणव घाडगे व धनाजी घाडगे यांनी परिश्रम घेतले त्यासाठी त्यांना मेकॅनिक मोटर विभागाचे निदेशक आशिष गांडुळे सर व
तसेच कॉलेजमधील जाधव सर ,घोडके सर ,बोडरे सर, वाघमारे सर, तरंगे सर, काटकर सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पुणे येथे होणाऱ्या तंत्र प्रदर्शन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी यांना प्रथम पसंती दिली आहे.
तरी या सर्वांचे संस्थेचे सचिव राहुल ताड व संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ताड आणि कॉलेजचे प्राचार्य रुपनवर सर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व सर्व निदेशकांचे अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज