टीम मंगळवेढा टाईम्स ।
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर रामचंद्र तोडकरी यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आज नागरी सत्कार समारंभ संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी ह भ प धोंडोपंत महाराज यांच्या शुभहस्ते जेष्ठ नेते बबनराव बाबुराव अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील, मा.आ. प्रशांत परिचारक, धनश्रीचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे,
दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय अवताडे ,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील ,
भैरवनाथ शुगर्सचे उपाध्यक्ष अनिल सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, गोपाळ भगरे , डॉ.विश्वनाथ शिंदे, श्री श्रीधर भोसले, श्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे.
यावेळी ग्रंथ तुला व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच आरोही सूर्यकांत तोडकरी हिच्या आठव्या वाढदिवसानिमित्त व अथर्व दिगंबर तोडकरी राज्यस्तरीय शालेय सेपकटकरा सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी विनोदी जुगलबंदी भारुड संदीप मोहिते महाराज विरुद्ध अण्णा चव्हाण महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . तरी सर्वांनी कार्यक्रमासाठी आज सायंकाळी सहा वाजता सद्गुरु कृपा निवास मित्र नगर मंगळवेढा येथे उपस्थित राहावे असे आव्हान तोडकरी परिवाराकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज