mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 15, 2020
in मंगळवेढा
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातून ४२ हजार रु . किमतीची मोटर सायकल चोरली

मंगळवेढा शहरातील दामाजी मंदिराजवळ लावलेली ४२ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटर सायकल चोरून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान , मंगळवेढा शहरातील मोटर सायकल पळविण्याचे प्रमाण वाढले असून मोटर सायकल चोरीची ही दुसरी घटना असल्याने मोटर सायकलस्वारामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

यातील फिर्यादी रोहित ओहाळे हे खोमनाळ येथून मंगळवेढा शहरात कामानिमित्त आलेहोते. दि.१३ रोजी सकाळी १०.३० वा. शहरातील दामाजी मंदिराजवळ असलेल्या खेतेश्वर दुकानासमोर एम.एच.१३ डी.डी. ३५५६ ही ४२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल लावून खरेदी करण्यासाठी फिर्यादी दुकानात गेले.

खरेदी करून पुन्हा मोटर सायकल लावलेल्या ठिकाणी आले असता जागेवर मोटर सायकल दिसून आली नाही. अज्ञात चोरटयाने मोटर सायकल चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस नाईक कोळी हे करीत आहेत.

अज्ञात चोरटयाने दुचाकी पळविली

मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मका फेडरेशन केंद्राजवळील २० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची काळया रंगाची व पांढऱ्या पट्टयाची सीटी १०० दुचाकी अज्ञात आरोपीने नेल्याची घटना सकाळी ९.०० ते १२.३० च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अज्ञात आरोपीविरूध्द सुधाकर गुलाब पवार ( वय ४२ भोसे ता.मंगळवेढा ) यांनी त्यांची बजाज सिटी कंपनीची एम एच १३ डी.बी .११०६ ही मोटर सायकल माइया संमतीवाचून अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे.

अज्ञात आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पवार हे करीत आहेत.

खडकी येथे विद्युत मोटारीच्या चोरी प्रकरणी तीघांविरूध्द गुन्हा दाखल

खडकी येथील हबीब शेख यांच्या विहिरीवरील 14 हजार रुपये किमतीची पाणबुडी मोटार चोरून नेल्याप्रकरणी रविंद्र शिंदे मेटकरवाडी,नितीन वाघमोडे हिवरगांव,सौरभ साबळे खडकी या तीघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी हबीब शेख यांच्या खडकी येथील शेतातील विहिरीत 5 एच पी ची 14 हजार रुपये किमतीच्या लाडा,लक्ष्मी कंपनीच्या तीन विद्युत मोटारी दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 च्या पुर्वी वरील तीघांनी चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याचा अधिक तपास पोलिस हवालदार दयानंद हेंबाडे हे करीत आहेत.दरम्यान, शेतातील बोअरवरील मोटारी,केबल,स्टार्टर,अ‍ॅटो स्वीच आदी साहित्य चोरण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून शेतकरी पोलिसात चोरीची फिर्याद दाखल करतात मात्र पोलिसांना आत्तापर्यंत एकही चोरटा जेरबंद करण्यात यश आले नसल्याने चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण पसरले आहे.

घरफोडयाबरोबर आता चोरटयांनी आपला मोर्चा शेतातील कृषी पंपाकडे वळविल्याने शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दुचाकी चोरीमंगळवेढामंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

वडिलांच्या उपचाराचा खर्च भावाला मागितला,  भावाने आई,भावजयसह मोठ्या भावालाच बदडले; मंगळवेढा तालुक्यातील संतापजनक घटना

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..