टीम मंगळवेढा टाईम्स ।
वडिलांच्या आजारावर उपचारासाठी केलेला खर्च मागितल्याच्या कारणावरून चौघांनी तिघांना शिवीगाळ करून मारहाण केली.
यात एक जण जखमी झाला. सोमवारी (दि १४ ) सकाळी साडेसातच्या सुमारास निंबोणी येथे ही घटना घडली आहे.
वडिलांच्या दवाखान्यातील खर्चावरून भाऊ भावात झालेल्या या संतापजनक घटनेबाबत मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्या चार जणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अनिल बिरा ढगे, स्वाती अनिल ढगे, सिध्दू महादेव ढगे, विलास शंकर ढगे (सर्व रा.निंबोणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
यातील फिर्यादी तम्मा बिरा ढगे ( वय ४० , रा . निंबोणी ) हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा संशयित हे तेथे आले. तम्मा व त्यांच्या आईने त्यांच्याकडे वडिलांच्या आजारावर उपचारासाठी झालेल्या दवाखान्याचा खर्च मागितला.
त्यामुळे संशयितांनी सारखे पैसे का मागतो , अशी विचारणा करत शिवीगाळ , काठीने मारहाण केली त्यात ते जखमी झाले.
भांडण सोडविताना आई, पत्नी यांनाही संशयितांनी हाताने मारहाण केली. याप्रकरणी संशयितांवर कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. नाईक हरिदास सलगर तपास करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज