mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 7, 2026
in मंगळवेढा
जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

मंगळवेढा टाईम्स न्युज । 

तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराला  मंगळवेढा मध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उदघाटन तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बी.आर.माळी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा शिवशरण, संगीता दुधाळ, रमेश भांजे उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्या दीपाली आनंद ताड, विनायक यादव, जयश्री कवचाळे, मोहिनी गणपाटील, आप्पासो निकम, सुरेश कांबळे, अर्जुन मल्लाळे, जयश्री शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले, तर आभार नायब तहसीलदार शीतल कन्हेरे यांनी मांडले. तर तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, उपअधीक्षक भूमी अभिलेख विद्या तांगडे, तसेच पंचायत समिती, वनविभाग, महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवेढा शहरालगत असणाऱ्या जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभाग व इतर विभागाचे असे एकूण 23 स्टॉल तयार करण्यात आले होते.

मंगळवेढा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी एकाच छताखाली महसूल विषयक सेवा देताना दिसून आले

तर तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.

मंगळवेढा तालुक्यात एकूण 6 शिबीर राबविण्यात येणार असून आज मंगळवेढा व बोराळे मंडळाच्या शिबिराने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

आजच्या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेतला.

आजच्या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीने पुढीलप्रमाणे सेवांचा लाभ जनतेला देण्यात आला, अभियानांतर्गत आजरोजी निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या – 206, अभियानांतर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 12,

अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 उपलब्ध करून दिलेली संख्या – 327, अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या – 568, अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या – 19,

अभियानांतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या – 5, अभियानांतर्गत अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांची संख्या -4,

तसेच आतापर्यंत एकूण 175 घरकुल लाभार्थ्यांना 540 ब्रास वाळूचे मोफत वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर संजय गांधी योजनेच्या वतीने 111, पुरवठा विभागाच्या वतीने 61, अभिलेख शाखेच्या वतीने अरळी गावातील 10 लाभार्थ्यांना शेतकुंडली वाटप,

44 लाभार्थ्यांना 21000 रु उत्पन्नाचे दाखले, 13 लाभार्थ्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप, 4 लाभार्थ्यांना घरकुल साठी शासकीय जागा वाटप, 8 लाभार्थ्यांना पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्याचा आदेश वाटप, निवडणूक विभागाकडून 10 लाभार्थ्यांना मतदान ओळखपत्र वाटप,

12 लाभार्थ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणी करून देण्यात आली, 12 लाभार्थ्यांना कलम 155 अंतर्गत 7/12 दुरुस्ती करून देण्यात आली, तृतीयपंथी 2 लाभार्थ्यांना 21000 रु उत्पन्नाचा दाखला काढून त्यांची नावे मतदार यादीत नोंद करून देण्यात आली.

सेतू व महा ई सेवा केंद्रामार्फत 63 उत्पन्न प्रमाणपत्र व 13 अधिवास प्रमाणपत्र देण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने आज एकूण 1529 नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.
त्याचबरोबर पंचायत समिती मार्फत 12 लाभार्थ्यांना ई मोशन बाईक, ई रिक्षा, शेळी गट, पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीनचा लाभ देण्यात आला.

कृषी विभागाच्या वतीने 8 लाभार्थ्यांना विविध अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आली, तर वन विभागामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना चेकद्वारे लाभाचे वाटप करण्यात आले.

यानंतर दिनांक 14 मार्च रोजी आंधळगाव, 10 एप्रिल रोजी पाटखळ, 17 एप्रिल रोजी मरवडे, 8  मे रोजी भोसे व 15 मे रोजी नगर परिषद हद्दीत होणाऱ्या शिबिरांना सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

शेत कुंडली” हा ठरला राज्यातील पहिला उपक्रम.

1) शिबिर ठिकाणी तयार करण्यात आलेले सेल्फी पॉईंट हे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

2)तहसील कार्यालय मंगळवेढा आयोजित नाविन्यपूर्ण उपक्रम “शेत कुंडली” हा ठरला राज्यातील पहिला उपक्रम.

3)तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तहसील कार्यालयाकडून 2 लाभार्थ्यांना विशेष लाभ देण्यात आला.

4) उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुक्यातील बचत गटांच्या महिलांच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन केशतेल, बिस्कीट, चिवडा, बासुंदी अशा विविध वस्तू व खाद्य पदार्थांची खरेदी केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: छत्रपती महाराजस्व अभियान

संबंधित बातम्या

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
Next Post
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी 'सुवर्णसंधी'! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

ताज्या बातम्या

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा