टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 506 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
आज 3 हजार 391 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 2 हजार 885 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 506 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या 506 जणांमध्ये 333 पुरुष तर 173 जणांचा समावेश आहे. आज कोकोनामुक्त होऊन 336 जण घरी पोहोचले आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 20 हजार 884 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये 12 हजार 879 पुरुष तर आठ हजार पाच महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत 572 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
त्यामध्ये 394 पुरुष आणि 178 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे आजही सहा हजार 943 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उपचार घेऊन बरे होऊन 13 हजार 351 जण सुखरुप घरी पोचले आहेत.
आज ‘या’ गावातील रुग्णांचा मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील घाडगे वस्ती देगाव येथील 75 वर्षाची महिला, समतानगर अक्कलकोट येथील 87 वर्षांचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 85 वर्षाचे पुरुष, भक्ती मार्ग पंढरपूर येथील 52 वर्षाची महिला, अनकढाळ (ता. सांगोला) येथील 70 वर्षाचे पुरुष, खंडाळी (ता. माळशिरस) येथील 69 वर्षाचे पुरुष,
तर मोहोळ शहरातील बुधवार पेठ येथील 54 वर्षाचे पुरुष, भोसरे (ता. माढा) येथील 55 वर्षाचे पुरुष, बक्षीहिप्परगे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 70 वर्षाची महिला, बागवान गल्ली अक्कलकोट येथील 65 वर्षाचे पुरुष तर पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाच्या पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात 78 पॉझिटिव्ह सापडले
सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने टेस्टची संख्या वाढवा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. 19) प्रशासनाला दिले. मात्र, शनिवारी 477 संशयितांची टेस्ट झाली होती, तर आज (रविवारी) 469 संशयितांचीच टेस्ट केल्याचे स्पष्ट झाले. त्यात 78 पॉझिटिव्ह सापडले असून हत्तुरे वस्तीतील 72 वर्षीय महिला, विजयपूर रोडवरील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरुष आणि सावली सोसायटी (इंदिरा नगर) येथील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात आज होमकर नगर (भवानी पेठ), आदित्य नगर, इंदिरा नगर, डीसीसी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, देशमुख नगर, सुंदरम नगर (विजापूर रोड), शेळगी, मल्लिकार्जुन नगर, गुरुनानक नगर, मुरारजी पेठ, पाने सोसायटी, बेगम पेठ, सुशिल नगर, भवानी पेठ, कलासंगम अपार्टमेंट, आकाश नगर, गणेश नगर (बाळे), चौगुले पार्क, शंकर नगर (होटगी रोड), सहवास नगर, सिटीझन पार्क, करुणा सोसायटी,
तर महालक्ष्मी नगर (मजरेवाडी), सिध्देश्वर नगर (नई जिंदगी), गायत्री नगर, पीडब्ल्यूडी क्वार्टर (सिव्हिल लाईन), उत्तर कसबा, बिलाल नगर, मुद्रासन सिटी, गीता नगर, अरविंदधाम (निराळे वस्ती), मंत्री चंडक नगर, रेल्वे लाईन, शेटे नगर, सिध्देश्वर नगर, शिवयोगी नगर, दत्त नगर (जुळे सोलापूर), पश्चिम मंगळवार पेठ, जोशी गल्ली, पद्मा नगर, जोशी गल्ली, गोल्डफिंच पेठ, उमा नगरी, रविवार पेठ, दक्षिण बसका, जोडभावी पेठ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. (सकाळ)
Solapur rural city corona update 506 new corona positive 11 victims today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज