टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने आज सोमवार, दि. 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या बंद बाबतीत घ्यावयाची खबरदारी.
कुठल्याही वाहनांस अडवू नका, नासधूस करु नका.
शेतकऱ्यांच दुध भाजीपाला विक्री रोखू नका.
कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका.
स्वयंरोजगार करणाऱ्या समुहाला रोखू नका.
अफवांवर विश्वास ठेवू नका.
सोलापूर जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज संघटनेचे जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी दिली.
ग्रामीण भागातील लोकांनी संबंधित आमदारांच्या घरासमोर आंदोलन करावे, तसेच प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यामुळे आज संपूर्ण शहर व जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोठेही हुल्लडबाजी न करता तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता शांततेच्या मार्गाने समाजाची ताकद सरकारला दाखवून द्यावी, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूर शहरात असा बंद असेल
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती येथील घरासमोर पुरुषोत्तम बरडे, मनोहर सपाटे, नानासाहेब काळे, अमोल शिंदे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, भाऊसाहेब रोडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सात रस्ता येथील घरासमोर नलिनी जगताप, निर्मला शेळवणे, उज्ज्वला साळुंखे, अभिंजली जाधव, मनीषा नलावडे, संजीवनी मुळे, लता ढेरे, प्रियंका डोंगरे, माधुरी चव्हाण, लता फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून सकाळी 10 वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्वांनी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड परिसरातील घरासमोर आंदोलन होणार असून त्यासाठी समाज बांधवांनी जुळे सोलापूर येथील डि मार्टच्या मैदानावर सकाळी 11 वाजता जमा व्हावे, असे आवाहन राजन जाधव, गणेश वानकर, श्रीकांत डांगे, प्रशांत पाटील, शाम कदम, दत्तात्रय मुळे, चेतन चौधरी यांनी केले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शेळगी येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी समाजबांधवांनी सकाळी 11 वाजता शेळगी येथील उड्डाणपुलाखाली जमा व्हावे, असे आवाहन माऊली पवार, शहाजी पवार, संतोष पवार, ज्ञानेश्वर सपाटे, लहू गायकवाड, प्रकाश जाधव, दत्ता वानकर, दत्ता घुले, प्रकाश जाधव यांनी केले आहे.
Maratha community aggressive in Solapur district! Reservation questions will be kept closed today
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज