टीम मंगळवेढा टाईम्स । गावातील तरुणाशी प्रेमसंबंध असतानाही. दुसरीकडे झाल्यामुळे सोहाळे (ता.मोहोळ) येथे नवविवाहिता आणि तिच्या प्रियकराने घेऊन आत्महत्या केली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.
पूजा प्रवीण पाटील आणि ज्ञानेश्वर रामचंद्र बचुटे असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. हे दोघेही नातेसंबंधांतील आहेत. पूजाचे लग्न २० दिवसांपूर्वीच म्हणजे ३० ऑगस्ट रोजी झाले होते. चार दिवसांपूर्वीच मोहोळ तालुक्यात नरखेड येथे अशाच पद्धतीने नातेसंबंधातील प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली होती.
प्रेम प्रकरणातून एका प्रेमी युगुलाने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोहाळे (ता. मोहोळ) येथे घडली. पूजा प्रवीण बचुटे-पाटील (वय 22, रा. नागज फाटा, ता. सांगोला) व ज्ञानेश्वर रामचंद्र बचुटे (वय 21, रा. सोहाळे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
कामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांचे अगोदरपासून प्रेमसंबंध होते. मृत मुलगी ही विवाहित आहे.
गेल्या बारा-तेरा दिवसांपूर्वी सोहाळे येथे ती माहेरी आली होती. त्या वेळी दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी सोहाळे येथील माणिक महादेव बचुटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला.
दरम्यान, रविवारी सकाळी माणिक बचुटे हे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यासंदर्भात कामती पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बबलू नायकवाडी करीत आहेत.
चार दिवसांपूर्वीच गुरुवारी (ता. 17) प्रेमसंबंध घरातील व नातेवाइकांना समजेल, या भीतिपोटी एका प्रेमी युगुलाने नरखेड (ता. मोहोळ) येथे आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, (रविवारी) अजून एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याच्या घटनेने मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Solapur mohol sohale Suicide of a loving couple again in Mohol
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज