टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरात काल 4 जुलै रोजी मराठा समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार तसेच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलं.
काल सोलापूर जिल्हाभरातून या मोर्चासाठी हजारोच्या संख्येने मराठा बांधव सोलापूरमध्ये जमले होते. या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचं उघड समर्थन होतं त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले सात आमदार दोन खासदार तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर इत्यादी नेते हजर होते.
सोबतच भाजपचे इतर पदाधिकारी देखील हजर होते या सर्व पदाधिकाऱ्यांवर तसेच नरेंद्र पाटील आणि मोर्चाच्या सोलापुरातील समन्वयकांवर सोलापूर मधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भांदवी कलम 188,269,270,336 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मोर्चाच्या समन्वयकांसह दोन खासदार सात आमदार आणि महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘या’ प्रमुखांवर दाखल झाला गुन्हा
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजित नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील,
आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राम सातपुते तसेच सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, माजी आमदार नरेंद्र पाटील, किरण पवार, राम जाधव, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, अमर पुदाले, विनायक विटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील,
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी नगरसेवक अनंत जाधव, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सतीश ऊर्फ बिज्जू प्रधाने, राजू सुपाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगरसेवक संतोष भोसले, सोमनाथ राऊत, प्रसाद लोंढे, निखिल भोसले, विजयकुमार डोंगरे, मोहन डोंगरे, ललित धावणे,
मतीन बागवान, प्रताप पाटील, मनोज शिंदे, विजयकुमार साठे, राजकुमार पाटील, सौदागर क्षिरसागर, विष्णू बरगंडे, सुरेश आंबुरे, अमीर मुलानी, पांडुरंग गायकवाड, मकरंद माने, अक्षय सूर्यवंशी, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे व आणखी काही जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आक्रोश मोर्चावेळी पोलिसांनी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शूटिंग काढून घेतले आहे. फौजदार चावडी पोलिसांनी 46 जणांची नावे निष्पन्न करून त्यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल केला आहे.
आता आणखी शूटिंग पाहून त्यातील प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंडले हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज