टीम मंगळवेढा टाईम्स । चालकाने पाठीमागे न पाहता टिपर मागे घेतल्याने त्याचा धक्का लागून वृध्द खाली पडला. तसेच त्यांच्या पायावरून टिपर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी काटेगाव येथील कळबवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. (The old man was crushed as he pulled back the tipper in the rain; The crime of culpable homicide on the driver)
रंगनाथ पांडुरंग शेलार (वय ८०,रा.काटेगाव ) असे मृताचे नाव आहे.याप्रकरणी टिपरचालकावर तालुका पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे . बाबासाहेब बबन मुरकुटे ( रा . चुंब , ता . बार्शी ) असे गुन्हा दाखल झालेल्या टिपरचालकाचे नाव आहे.
सुखदेव भाऊराव शेलार (रा.काटेगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली . चालक मुरकुटे हा टिपर ( एम एच ०४ ई वाय २४२४ ) मागे घेताना हा अपघात घडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज