mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार, दौंडमधून उजनीत ‘एवढा’ क्युसेक विसर्ग; पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2021
in सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

टीम मंगळवेढा टाईम्स ।

चालू हंगामात उजनीत दौंडमधून 9 हजार 40 क्युसेकचा विसर्ग चालू झाला असून आजपासून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असल्याने भीमा पात्रावरील धरणांतील पाणीठ्यात वाढ दिसून येत आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत उजनी धरणात 2.5 टक्के पाणीसाठा वाढला असून आतापर्यंत 97 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्याचाही परिणाम उजनी पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

सद्यस्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 24 टक्क्यांपर्यंत गेली होती. त्यात वाढ होऊन ती 14.16 टक्के वर आली आहे. त्यामुळे उजनी पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे होण्यास प्रारंभ झाला आहे.

भीमा नदीच्या खोर्‍यात असलेल्या सर्व धरणांमध्ये 21 जून रोजी एकूण 19 धरणांपैकी 18 धरणांचा उपयुक्त पाणीसाठा आहे. खोर्‍यातील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणात मात्र उणे 14.16 टक्के टक्के इतका पाणीसाठा आहे. उर्वरित 19 धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा आहे.

गेल्या 3 वर्षांत पाऊस लांबत गेल्याने भीमा नदीच्या खोर्‍यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळे पाणी वापरही नियंत्रित झाला. यंदाच्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेला वादळी पाऊस यामुळे शेतीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे.

यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून 21 जून रोजी तब्बल सहा दलघमी पाणीसाठा आहे.

उजनी वगळता वरील 19 धरणांमध्ये सरासरी 40 ते 50 टक्के इतका पाणीसाठा दिसून येतो. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.

उजनीत दौंड येथून येणार्‍या विसर्गाला सुरुवात झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उजनीच्या पाणीसाठ्यात येत्या दोन दिवसांपासून हळूहळू वाढ होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरीवर्गाचे उजनी धरण 100 टक्के यावर्षी भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरणपाणीसाठा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

नागरिकांना दिलासा! मंगळवेढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; प्रचंड नुकसानीची शक्यता

June 4, 2023
झंझावात! अभिजीत पाटील यांच्याकडे जाहीर प्रवेशाची मालिका सुरूच, पाटील – पवार – रोंगे एकाच व्यासपीठावर; यांचा पाटील गटांमध्ये प्रवेश

झंझावात! अभिजीत पाटील यांच्याकडे जाहीर प्रवेशाची मालिका सुरूच, पाटील – पवार – रोंगे एकाच व्यासपीठावर; यांचा पाटील गटांमध्ये प्रवेश

June 3, 2023
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

सावधान! आज, उद्या जणू उष्णतेची लाटच; उगाचंच घराबाहेर नका पडू, ‘ही’ काळजी घ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

June 2, 2023
पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

पोलीस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, सर्व राजकीय पक्ष एकवटले, बेमुदत धरणे आंदोलन सुरु; माने यांना कोण पाठीशी घालीत आहेत? आता कारवाई शिवाय माघार नाही

June 2, 2023
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! ‘सिबिल स्कोअर’ शून्य असले तरीही मिळणार कर्ज; पण पीक कर्जासाठी आता ‘ही’ पडताळणी केली जाणार

June 1, 2023
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील स्मारकासाठी आंदोलन उभारणार; बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले जाहीर

June 1, 2023
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
शेतकऱ्यांनो! सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार; अभिजीत पाटील यांची ग्वाही

सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो; सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद

May 30, 2023
Next Post
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, समाजबांधव यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर; केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांचा नादखुळा! ‘हॅपी बर्थडे टू यू’च्या सुरात वृक्षांचा चौथा वाढदिवस साजरा; निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त

मंगळवेढेकरांचा नादखुळा! ‘हॅपी बर्थडे टू यू’च्या सुरात वृक्षांचा चौथा वाढदिवस साजरा; निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त

June 6, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

शेतकऱ्यांनो! गारपीठ अन् अवकाळीमुळे नुकसान भरपाई होणार ‘या’ तारखेला जमा; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 6, 2023
मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मिशन ॲडमिशन, विद्यार्थ्यांनो! मोहिते पाटील कॉलेज मध्ये “अकरावी सायन्स”साठी प्रवेश प्रकिया सुरू

June 5, 2023
खळबळ! दरोडेखोर धरताना दारूची जीप पकडली; मंगळवेढ्यात पोलिसांवर हल्ला करणारे तिघे ताब्यात

खळबळ! दरोडेखोर धरताना दारूची जीप पकडली; मंगळवेढ्यात पोलिसांवर हल्ला करणारे तिघे ताब्यात

June 5, 2023
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

मंगळवेढा प्रांताधिकारी कार्यालयावर ‘समविचारी’चा आज हलगीनाद मोर्चा; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

June 5, 2023
मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

नागरिकांना दिलासा! मंगळवेढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; प्रचंड नुकसानीची शक्यता

June 4, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा