टीम मंगळवेढा टाईम्स ।
लग्न करून विवाहिता घरातील दागिने, पैसे घेऊन पळून गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशाप्रकारे लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना अटकही करण्यात आली आहे.
मात्र, कर्नाटकमधून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. एक महिला सातव्यांदा घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिली.
यात काही गैरप्रकार आहे, हे न्यायाधीशांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व सातही घस्फोटित नवऱ्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयातील सुनावणीच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यात न्यायाधीश महिलेच्या वकिलांना विचारतात की, ‘हे सातव्या पतीसंदर्भातील प्रकरण आहे का? सर्वांविरोधात ‘४९८ अ’ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत का?’ त्यावर वकील उत्तर देतात, ‘होय.
सर्वाविरोधात ‘४९८अ’ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय महिलेने पोटगीदेखील मागितली होती. वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, ‘ही महिला कायद्यासोबत खेळत आहे.’
हुंडाविरोधी कलमान्वये पती आणि सासरच्यांवर गुन्हे दाखल करायचे आणि भली मोठी रक्कम घेऊन तडजोडीने घटस्फोटाचे प्रकरण मिटवायचे. एक घटस्फोट झाला की नवे सावज शोधाचे, असा तिचा डाव असायचा. (वृत्तसंस्था)
महिला अशी करायची फसवणूक
• घटस्फोटासाठी आलेली महिला एकेका पतीसोबत सहा महिने ते एक वर्ष राहायची. छळ केल्याची तक्रार दाखल करून माहेरी परत येत होती आणि
तडजोडीने पैसे मिळवायची. अशाप्रकारे तिने सहावेळा घटस्फोट घेतला.
सातव्यांदा घटस्फोट घेत असताना ही बाब न्यायाधीशांच्या लक्षात आली
महिलेचे लग्न आणि संबंधित कागदपत्रेदेखील न्यायालयात सादर करण्यात आली. या प्रकरणाने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज