टीम मंगळवेढा टाईम्स ।
काळानुसार एसटी सेवा बदलावी, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी रेल्वे तिकिटाच्या आरक्षणाच्या धर्तीवर एसटीचे आधुनिक ॲप आहे.
या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना घरी बसल्या ठिकाणी एसटीचे तिकीट काढता येणार आहे. यामुळे या ॲपचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असते. दररोज एसटीतून लाखो प्रवासी प्रवास करत असतात.
अनेक प्रवासी नियोजन करून एसटीने प्रवास करतात; पण यासाठी अनेक प्रवासी स्थानकात येऊन गाड्यांची चौकशी करतात, त्यानंतर आरक्षण काढून येथून प्रवास करतात;
पण अनेकांना एसटीच्या ॲपबद्दल माहितीच नाही. यामुळे प्रवाशांना ॲपबद्दल माहिती व्हावी, यासाठी एसटी प्रशासनाकडून याची माहिती देण्यात येत आहे.
सध्या अनेक प्रवासी हे प्रवास करताना एसटीच्या ॲपचा वापर करत आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचत आहे. शिवाय घरबसल्या ठिकाणी त्यांना आवडेल ते सीट बुक करता येत आहे. यामुळे अनेक प्रवासी या ॲपच्या माध्यमातून सीट बुक करत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
घरबसल्या काढता येणार तिकीट
सध्या डिजिटल युग आलेले आहे. त्यानुसार काळानुसार आता एसटी महामंडळसुद्धा बदलत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने देखील त्यांचे तिकीट काढण्याचे सुविधा ही ऑनलाइन पद्धतीने आणलेली आहे. त्यामुळे प्रवासी आता घरबसल्या एसटीचे तिकीट काढू शकणार आहेत.
असे करा ऑनलाइन बुकिंग प्रवाशांना आता घरबसल्या
एसटीचे तिकीट ऑनलाइन बुक करता येणार आहे. यासाठी ‘एमएसआरटीसी’ बस रिझर्व्हेशन हे मोबाइल ॲप डाऊनलोड करावे. यात आपली माहिती टाकून लॉगिन करावे. त्यानंतर येथे ज्या गावी जायचे आहे,
त्या गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे ॲप वापरताना किंवा तिकिटाचे पैसे देताना काही अडचण असल्यास त्यांनी एसटी प्रशासनाशी संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज