मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
हल्ली पोरं जेवत नाही म्हणून हातात मोबाईल, पोरं दंगामस्ती करता म्हणून लगेच हातात मोबाईल दिला जातो, सध्या हा प्रकार पालकांकडून सर्रास घडत आहे. मोबाईलचं इतकं व्यसन जडलं आहे, की पोरं मोबाईलमध्ये इतके गुंगले आहे की, कशाचं भान राहत नाही.
अशातच नाशिकमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मोबाईलमध्ये मग्न झालेला मुलगा चौथ्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या भद्रकाली परिसरात दुपारच्या वेळी ही घटना घडली. अरबाज सलीम खान असं 17 वर्षीय मुलाचं नाव आहे. चौथ्या मजल्यावरून पडल्यानंतर तो पत्र्याच्या शेडवर आदळला. या दुर्घटनेत अरबाज खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.
भद्रकाली इथं असलेल्या शिंगाडा तलावाच्या परिसरात म्हसोबावाडीमध्ये अरबाज खान हा आपल्या कुटुंबीयांसह राहतो. सकाळी अरबाज खान हा नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये बसलेला होता.

बाल्कनीमध्ये बसून मोबाईलमध्ये मग्न झाला होता. मोबाईलमध्ये सर्फिंग करत तो इतका बिझी झाला की, तो बाल्कनीच्या कडेवर बसला होता. याच त्याला भान राहिलं नाही. अचानक त्याचा तोल गेला आणि तो चौथ्या मजल्यावरून पडून खाली पडला.

चौथ्या मजल्यावरुन कोसळल्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावर एका पत्र्याच्या शेडवर जोरात आदळला. आवाज झाल्यामुळे शेजारी धावत बाहेर आले. अरबाजच्या कुटुंबीयांना आवाज देण्यात आला.
अरबाजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पत्राच्या शेडवरून जमिनीवर आदळल्याने तो जबर जखमी झाला आहे. अरबाजची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














