mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काळा जादू! यमराजाच्या मनात आलं अन् परत पाठवलं, चक्क तिरडीवरच उठून बसला ‘मृत तरूण’; पोलिसांनी घेतले ताब्यात; चौकशी सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2022
in राज्य
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सत्तावीसावा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त तर ‘एवढी’ वाढ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अकोल्या जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात एक धक्कादायक प्रकार घडला असून डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरूण चक्क उठून बसला आहे. प्रशांत मेशरे असं या तरूणाचं नाव असून त्याला बुधवारी डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.

त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली गेली अन् अंत्यसंस्कारासाठी नेत असताना हा तरूण तिरडीवरच उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अधिक माहितीनुसार, प्रशांत मेशरे हा तरूण मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. या तरूणाच्या अंगात देव येत असल्याच्या चर्चाही गावात सुरू आहेत.

त्याचबरोबर त्याच्यामध्ये दैवी शक्ती असल्याचाही आरोप केला जातोय. तर काल या तरूणाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली होती.

संध्याकाळी सातच्या दरम्यान मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तिरडी हलू लागल्याने मृतदेह खाली ठेवण्यात आला आणि तरूण जिवंत असल्याचं लक्षात आलं.

त्यानंतर तिरडी मंदिरात आणली गेली. त्यानंतर प्रशांत तिरडीवरच उठून बसला. त्याला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी जमा झाली. त्याच्याकडे दैवी शक्ती असल्यामुळे तो मृत झाल्यानंतरही उठून बसल्याच्या चर्चा गावात सुरू झाल्या आहेत. तर यमराजाच्या मनात आलं अन् परत पाठवलं असाच काहीसा प्रकार घडला आहे.

दरम्यान, प्रशांत होमगार्डमध्ये कामाला असून तो मंत्रतंत्राच्या गोष्टी करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तर या घटनेनंतर प्रशांतला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली.

या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं असून प्रशांत आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मृत तरुण जिवंत झाल्याचा बनाव?; पोलिसांनी घेतले ताब्यात; चौकशी सुरू

रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जात असताना गावकऱ्यांना तिरडीवर हालचाल होताना दिसून आली. त्याला गावातील एका मांत्रिकाने जिवंत करण्याचा दावा केला. मांत्रिकाने एका खोलीत मंत्र-तंत्र म्हटले. त्यानंतर प्रशांत उठून बसला. हे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले.

त्यामुळे प्रशांतला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी घटनास्थळावर चान्नी पोलिसांनीदेखील धाव घेतली. हा सर्व प्रकार गूढ व संशयास्पद असल्याने चान्नी पोलिसांनी संबंधित युवक, त्याचे कुटुंबीय व तांत्रिकाची चौकशी केली.

पोलिसांनी युवकाची संपूर्ण आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये तो युवक निरोगी असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे कुठलेही प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार बनाव असल्याचे चान्नी पोलिसांनी सांगितले. अंधश्रद्धा पसरवणारा हा प्रकार संबंधित युवक व त्याच्या कुटुंबाने का केला, याचा शोध चान्नी पोलिसांकडून घेतला जात आहे.(स्रोत:लोकसत्ता)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अकोला

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
गांधीगिरी! ऊस दराची घोषणा न झाल्याने मंगळवेढ्यात ऊसाची वाहने शेतकर्‍यांनी अडविली

गांधीगिरी! ऊस दराची घोषणा न झाल्याने मंगळवेढ्यात ऊसाची वाहने शेतकर्‍यांनी अडविली

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा