mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 21, 2025
in राज्य
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मान्सूनपूर्वच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह वीज कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

दुसरीकडे निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर आहे. त्यातच, अकोल्यात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ 20 हजार रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

देवानंद सुखदेव इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतातीलच आंब्याच्या झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं.

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निमकर्दा येथे देवानंद इंगळे राहात होते. मृत इंगळे यांच्याकडे जवळपास मुद्दल आणि व्याजाची रक्कम मिळून 20 हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज होते.

अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. इंगळे यांच्याकडे एकर शेती होती, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून इंगळे यांनी आत्महत्यासारखं टोकाचा पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, सेवा सहकारी सोयायटीच्या सचिवांनी गाव तलाठ्यांना पत्र लिहून या कर्जाबाबतची माहिती दिली आहे.

देवानंद इंगळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सन 2022 चे पीकर्ज रुपये 15000 आणि 5400 रुपये व्याज अशी एकूण 20,450 रुपयांचे कर्ज असल्याची नमूद केले आहे. मयत सभासदाच्या कर्जाची माहिती देण्यात येत असल्याचे सांगत सोसायटी सचिवांनी हे पत्र तलाठी महोदयांना दिले आहे.

महाविस्तार AI अॅपचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकी’दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या ‘डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र’ संकल्पनेला अनुसरुन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासन अधिक सक्षम,

लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार – AI अ‍ॅप’चे लोकार्पण केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषी विषयक सल्ला देणाऱ्या ‘महाविस्तार – AI ॲप’ची माहिती सांगणारी AV याप्रसंगी सादर करण्यात आली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी आत्महत्या

संबंधित बातम्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! लाडका शेतकरी योजना जाहीर; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ”इतकी” हजार रक्कम

यंदा कसा असेल पाऊस! शेतकऱ्यांसाठी कोणत्या सरकारी उपाययोजना? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची अपडेट

ताज्या बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा