टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल झाला यामध्ये आवताडे गटाने 12 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवलेली असल्याचा दावा आवताडे गटाने केला आहे. माचणूर ग्रामपंचायती मध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात आवताडे गटाला यश आले असून जनार्धन शिवशरण यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
आवताडे गटाकडे सत्ता आलेल्या ग्रामपंचायतीवर केलेला दावा.
1कर्जाळ/कात्राळ 09 पैकी 09,2) माचणुर 09 पैकी 09,3) सलगर बु. 11 पैकी 11,4) घरनिक्की 09 पैकी 09,5) हुलजंत्ती 13 पैकी 13,6) तामदर्डी 07 पैकी 07,7) भोसे 15 पैकी 09,8) बोराळ 13 पैकी 10,9) डोणज 09 पैकी 05,10) कचरेवाडी 09 पैकी 06,11) गणेशवाडी 07 पैकी 05,12) अरळी 11 पैकी 05,13) सिध्दापुर 11 पैकी 05,14) बालाजीनगर 09 पैकी 04,15) मल्लेवाडी 07 पैकी 03,16 आसबेवाडी 07 पैकी 03,17) लवंगी 09 पैकी 03
तर लेंडवे चिंचाळे,मल्लेवाडी, भोसे, तांडोर, डोणज,अरळी,आसबेवाडी,लवंगी,मरवडे,तामदर्डी,बोराळे,हुलजंती,बालाजीनगर आदी ग्रामपंचायतीवर भालके गटाने दावा केला आहे.
तर नंदेश्वर,बोराळे,महमदाबाद(शे) व सिद्धापूर येथे परिचारक गटाची सत्ता आल्याचा दावा केला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 22 जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेत्यांना आपल्या गावात वर्चस्व प्रस्थापित करता आले.
त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ , सदस्य रमेश भांजे यांनी आपल्या गावातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.
186 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज शासकीय गोडाऊनमध्ये झाली. तहसीलदार स्वप्नील रावडे , नायब तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतमोजणी सुरू करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निरीक्षक श्री.जोशी यांनी मतमोजणी दरम्यान केंद्राला भेट दिली. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील , पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे , सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला.
बालाजी नगर येथील मनीषा पवार व श्रीकांत चव्हाण यांना 159 मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे श्रीकांत चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. मरवडे येथे सत्ताधारी गटाला विरोध करत स्थापन करण्यात आलेल्या गाव आघाडीने आठ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे.
लवंगी ग्रामपंचायतीवर भालके गटाचे वर्चस्व कायम राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले आहे. तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार हे डोणज ग्रामपंचायतमधून विजयी झाले आहेत. तर नंदेश्वर ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती दादा गरंडे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
चिठ्ठीद्वारे श्रीकांत चव्हाण विजयी
बालाजी नगर येथील मनीषा पवार व श्रीकांत चव्हाण यांना 159 मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे श्रीकांत चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले.
मरवडे येथे सत्ताधारी गटाला विरोध करत स्थापन करण्यात आलेल्या गाव आघाडीने आठ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. लवंगी ग्रामपंचायतीवर भालके गटाचे वर्चस्व कायम राहिले.
तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नंदेश्वर, सिध्दापुर, बोराळे, महमदाबाद शे.या चार ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे निर्विवाद वर्चस्व असलेेला दावा
सलगर बु.कचरेवाडी,माचणुर,घरनिंकी या चार ग्रामपंचायतीवर परिचारक-आवताडे गटाची सत्ता तर आसबेवाडी,भोसे,लेंडवे चिंचाळे या तिन ग्रामपंचायतीवर परिचारक-भालके गटाची सत्ता असुन मरवडे ग्रामपंचायतीवर परिचारक गट- परिवार,लतिफ तांबोळी गटाची सत्ता मिळाली असुन सर्व नवनिर्वाचीत विजयी सदस्यांचा सत्कार पांडुरंग परिवाराच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक संपर्क कार्यालयामध्ये करणेत आला.
यावेळी माजी सभापती शिक्षण व आरोग्य जि.प.सोलापूर शिवानंद पाटील,जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,दामाजी शुगरचे माजी संचालक भारत पाटील,जालींदर व्हनुटगी,सरपंच रामेश्वर मासाळ,माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर,बापुराया चौगुले,बाबासाहेब पाटील,विश्वनाथ पाटील,भाजपाचे जिल्हा चिटणीस,संतोष मोगले,कांतीलाल ताटे,विष्णू मासाळ,सचिन चौगुले,रमेश पाटील,
पप्पु स्वामी,विजय बुरकुल,भारत गरंडे,बंडु करे,माधवानंद आकळे,हौसाप्पा शेवडे,बाळासाहेब काळुंगे,सोमनाथ क्षिरसागर,सचिन बोडके,श्रीकांत गणपाटील,भागवत भुसे,माणिक खटकाळे यांचेसह नवनिर्वाचीत सदस्य उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीवर भालके गटाचा दावा
मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच झालेल्या 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्व.आ भारत भालके गटाने आ भालके यांच्या निधनानंतर देखील जनतेने उस्फुर्तपणे विश्वास टाकत 12 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केला असल्याचा दावा केला आहे.
आ भालके यांच्या निधनांनंतर ही पहिलीच निवडणूक असून या गटाचे नेतृत्व विठ्ठलचे संचालक भगिरथ भालके हे करीत असून नानांप्रमाणे भगीरथ दादावर देखील प्रेम व्यक्त करीत जनतेने विश्वास व्यक्त करीत दादांच्या भावी आमदारकीवर शिक्कामोर्तब केले आहे तसेच नानांच्या नंतर भगीरथ दादाबरोबर मतदारांना नेहमी आपलेसे वाटणारे व्यंकटआण्णा भालके यांचा जनसम्पर्क देखील या गटाला फायद्याचा ठरला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारत तब्बल 12 ग्रामपंचायती मध्ये एकहाती सत्ता स्थापन केली यामध्ये हुलजत्तीं १३ पैकी १२ महमदाबाद (शे) ७ पैकी ७ तामदर्डी ७ पैकी ७ ,लेंडवे चिंचाळे ९ पैकी ७ अरळी ११ पैकी ६ बालाजी नगर ९ पैकी ५ लवंगी ९ पैकी ६ मल्लेवाडी ७ पैकी ५ आसबेवाडी ७ पैकी ४ भोसे १५ पैकी ९ तांडोर ७ पैकी ७ डोनज ९ पैकी ५ या ग्रामपंचायतचा समावेश आहे तर सलगर(बु ) येथे भालके आवताडे सर्वच्या सर्व 11 जागांवर विजयी झाले.
तर सिद्धापूर येथील 11 जागांपैकी भालके परिचारक गटाला 6 व भालके आवताडे गटाला 5 जागा मिळाल्या. तसेच बोराळे ग्रामपंचायत मध्ये भालके_ आवताडे परिचारक गटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला त्याच बरोबर मरवडे ग्रामपंचायत मध्ये गाव विकास आघाडीने 9 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज