टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या 630 शिक्षकांचा नोव्हेंबरचा पगार नवीन वर्षाचा प्रारंभ होण्यास एक दिवसाचा कालावधी बाकी असतानाही अदयाप न झाल्याने शिक्षक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान शालार्थ योजनेअंतर्गत दि.1 तारखेला पगार होईल अशी प्रशासनाने केलेली घोषणा हवेतच विरगळल्याच्या भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहेत.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे 630 शिक्षक कार्यरत असून 2 कोटी 52 लाख 60 हजार 953 इतकी रक्कम प्रति महिना लागत आहे.
नोव्हेंबर महिन्याचा पगार डिसेंबर महिना उलटूनही तसेच सन 2023 या नवीन वर्षाला प्रारंभ झाला असतानाही अदयापही प्रशासन पगार देण्याची मानसिकता दाखवत नसल्याने कर्मचारी वर्गातून असंतोष पसरला आहे.
शिक्षक हा समाजातील एक महत्वचा घटक असून तो नवीन पिढी तयार करण्याचे काम जबाबदारीने करीत असताना त्यांचे वेळेवर वेतन होत नसल्याने काम करण्याची मानसिकता राहिल का असा सवालही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.
मध्यंतरी शालार्थ योजना अंमलात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने कागदपत्रांची जुळवाजुळवी केली होती. या प्रणालीव्दारे दि.1 रोजी शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होईल असे सुतोवाच प्रशासनाकडून करण्यात आले होते.
मात्र ही योजना केवळ कागदावरच बाकी राहिलेली आहे.पुर्वी दि.5 च्या दरम्यान शिक्षकांच्या पगारी खात्यावर जमा होत होत्या.मात्र अलिकडे पगार वेळेवर देण्याचा बट्टयाबोळ सुरु झाल्याने शिक्षकांची मानसिकता बिघडत चालली आहे.
ज्या कर्मचार्यांचे निव्वळ पगारीवर कुटुंब चालते अशा शिक्षकांनी प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न उपस्थित होत असून किराणा,दुधवाले यांचे बिल पैशाअभावी वेळेत दिले जात नसल्यामुळे या व्यवसायिकांनीही नाकडोळे मुरडायला सुरुवात केली आहे.
दरम्यान,सोलापूर जिल्हयातील शिक्षकांचा पगार वेळेवर होत नसल्याचे लोण अधिवेशनात शुक्रवारी पोहोचले असून यावेळी शिक्षणमंत्री ना.केसकर म्हणाले शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने पगार थेट बँकेत जमा करण्याची पध्दत शासन सुरु करणार आहे.
यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल असे त्यांनी यावेळी आ. विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अधिवेशनात सांगितले. दिवाळीतही शिक्षकांना वेळेवर पगार व अॅडव्हान्स दिला न गेल्यामुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ शिक्षकांवर आली होती.
कोरोना कालावधीत वेळेवर पगारी केल्या.मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरु असताना वेळेवर पगार देण्यास शासन कुचराई का करत आहे असा सवालही उपस्थित होत आहे.
पगारी वेळेवर होत नसल्याने शासनाची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे काय असा प्रश्न सुजाण नागरिकांमधूनही शंका व्यक्त करीत विचारला जात आहे.
पुर्वी शिक्षकांच्या पगारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर एक तारखेला जमा होत असे. अता या पगारी डायरेक्ट शिक्षकांच्या बँक खात्यावर जमा करण्याची पध्दत रूढ झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज