मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकूल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रासप्रमाणे महिन्यातून एकदा १० ब्रास मिळणार आहे. यातून वाळूचा अवैध उपसा, वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील, अशी अशा आहे.
सध्या जिल्ह्यातील खानापूर, कुडल, देवीकवठे (ता. अक्कलकोट), मिरी-ताडोर (मोहोळ-मंगळवेढा), बाळगी, भंडारकवठे, लवंगी (ता. दक्षिण सोलापूर), माळेगाव, आलेगाव खु., टाकळे टें.,
गारअकोले (ता. माढा) आणि पंढरपूर तालुक्यातील आव्हे व नांदोरे या ठिकाणी सुमारे पावणेदोन लाख ब्रास वाळू उपलब्ध आहे. मात्र, शासनाचे वाळू धोरण अजून अंतिम न झाल्याने त्या ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत.
त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ६० हजार घरकुल लाभार्थींना शासनाचे वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे अन्य बांधकामधारकांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तूर्तास, बठाण (ता. मंगळवेढा) येथील वाळू ठेक्यावर उपलब्ध वाळूसाठी जिल्ह्यातील लोक ऑनलाइन नोंदणी करून वाळूची मागणी करू शकतात. वाळूच्या उपलब्धतेनुसार त्यांना वाळू मिळणार आहे.
नोंदणी कोठे करायची अन् किंमत किती?
घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे, तर इतरांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्यासाठी शासनाच्या ‘महाखनिज’ ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे.
त्यासाठी मिळकत उतारा, लाभार्थीचे आधारकार्ड, बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे.
वाळू ठेक्याची प्रतिब्रास किंमत १३७ रुपये, ६०० रुपये रॉयल्टी, १० टक्के डीएम (जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी), स्वॉप्टवेअर कंपनीचे चार्जेस, असे मिळून साधारणत: साडेबाराशे ते तेराशे रुपयांपर्यंत प्रतिब्रास वाळू मिळणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज