टीम मंगळवेढा टाईम्स ।
यंत्राने बनावट छपाई करून जेएसडब्ल्यू कंपनीचे बनावट पत्रे विकणाऱ्या शहरातील कडलास रोडवरील गोवा स्टील दुकानावर कंपनीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून १८ हजार ९८० रुपयांचे बनावट पत्रे आणि पन्नास हजार रुपयांची प्रिंटिंग मशीन असा ६८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत कंपनीचे प्रतिनिधी हंबीरराव ज्ञानू साठे यांनी गोवा स्टीलचे मालक भीमराव तोलाराम चौधरी (रा. सांगोला) यांच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला शहरातील कडलास रोडवरील गोवा स्टील या दुकानात मूळ कंपनीचा पत्रा कॉइल प्रेस मशीनमध्ये टाकून त्यावर प्रिंटरने जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावाने छपाई करून विक्री करीत असल्याची खबर कंपनीचे अधिकारी हंबीरराव साठे यांना मिळाली.
त्याबाबत दुकान व गोडावूनधारकावर कारवाई करण्यासाठी गुरुवारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप व पोलिस पथक कारवाई करण्यासाठी गेले. कंपनीचे अधिकारी व पोलिसांच्या पथकाने दुकान मालक भीमराव तोलाराम चौधरी यांच्या गोवा स्टील दुकानाची झडती घेतली.
या वेळी कंपनीचे तपासी अधिकारी हंबीरराव साठे यांनी जेएसडब्ल्यू कलर कोटेड पत्र्याची तपासणी केली असता त्यावर छोट्या अक्षरात बनावट छपाई करीत असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत पोलिसांनी ६ हजार ८०० रू किमतीचे आठ फुटाचे ६ पत्रे, ८ हजार ४०० रुपये किमतीचे १२ फुटाचे ५ पत्रे, ३ हजार ७८० रुपये किमतीचे १४ फुटाचे २ पत्रे, ५० हजार रुपये किमतीची प्रिटिंग मशीन असा ६८, ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज