mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 26, 2021
in क्राईम, मंगळवेढा
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कमी व्याजदरासह नाबार्डकडून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जादा दराने कर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवेढा तालुक्‍यातील डोंगरगाव येथील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची फिर्याद सोमनाथ सिद्धेश्वर साखरे (रा. भाळवणी) यांनी दिली. या फिर्यादीवरून तुळशीदास करांडे, विवेक खिलारे, जनार्दन गायकवाड, विशाल गायकवाड, देवा खिलारे, दादा माळी, प्रशांत पोरे, नागेश नरळे, वैशाली चंदनशिवे (सर्वजण रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (ता.मंगळवेढा) येथील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीचे तुळशीदास कारंडे व विवेक खिलारे यांनी पाच सदस्यांचा गट तयार करून गटातील सदस्याला दोन गायी खरेदीसाठी सात लाख रुपये दोन टप्प्यात कर्ज रूपाने देण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्याला 35 टक्के सबसिडी, नऊ टक्के व्याजदर सांगून गट स्थापन करण्यासाठी यशवंत तानाजी निळे यांची नियुक्ती केली. त्यानुसार गट स्थापन करण्यात आले. त्यास 100 रुपये स्टॅम्प, कोऱ्या व्हिड्रॉलवर सह्या करून घेतल्या.

एका गटासाठी मंजूर झालेले कर्ज रुपये 3 लाख 50 हजार कर्ज खात्यावर जमा होताच दहा मिनिटात ते पैसे संस्थेने खात्यावर वर्ग करून घेतले. संस्थेकडे विचारणा केल्यावर ती रक्कम देण्यास टाळाटाळ करत त्यातील सुरवातीला 55 हजार रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी काही रक्कम दिली. या संस्थेस दूध घालून त्यातून कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला.

कोरोना काळातही हप्ता कपात करणे बंद का केल्याबाबत विचारले असता, बॅंका बंद आहेत, असे सांगण्यात आले. सहा महिन्यांनंतर पुढचा हप्ता देणार होता त्याचे काय झाले, असे विचारले असता, कोरोना संपला की देतो, असे सांगण्यात आले. कोरोना काळात संस्थेचा दूधदर इतर संस्थांपेक्षा कमी होता.

कोरोना संपूनही दूध दरात वाढ न केल्याने फिर्यादीने स्वत: दुसरी खासगी संस्था सुरू करून दूध संकलन सुरू केले. त्या वेळी इतरांचे दूध येऊ लागल्याने जनार्दन भिकू गायकवाड, विशाल भिकू गायकवाड, देवा खिलारे, सचिन आकळे, विवेक खिलारे (रा. सर्वजण डोंगरगाव) यांनी फिर्यादीला फोन करून तू आमच्याकडे येणारे दूध व फॅट चेक करतो असे म्हणत फिर्यादीची डेअरी बंद पाडण्याची भाषा करत होते.

तुमचा दूधदर कमी आहे दर वाढवा असे सांगितले असता आम्हालाच मिळत नाही कोठून देऊ असे सांगण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांनी फिर्यादीच्या घरी येऊन बॅंकेचा हप्ता भरा पण रोक रक्कम घेणार नाही त्यासाठी दूध घाला त्यातून हप्ते घेऊ असे सांगितल्यावर दूधदर वाढवून दिल्यास आम्ही दूध घालतो नाहीतर नाही असे फिर्यादीने सांगितले.

त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी फिर्यादी व आईची अशी चार जनावरे (एम.एच 13 टी.सी 176 व एम.एच 13 सी.यू 1079) या दोन गाड्यांतून घेऊन जात असल्याचे सांगितले.

त्यावर बॅंकेचे कर्ज आहे, जनावरे घेऊन कसे जाता, असे विचारले असता “तुमचे सर्व पेपर आमच्याकडे आहेत,’ असे सांगत चार जनावरे ओढून नेली. त्यातील महिला प्रतिनिधीने फिर्यादीच्या आईस शिवीगाळ व मारहाण केली.

त्यानंतर बॅंकेत चौकशी केली असता कर्ज रक्कम 7 लाख 43 हजार असल्याचे आढळून आले. गटास मंजूर असलेल्या 7 लाखांपैकी प्रत्येक सभासदास 1 लाख 40 हजारांमधील 64 हजार 750 रुपये मिळाले.

फिर्यादी, त्याची आई व इतराची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराभ गुंजवटे हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post

मंगळवेढा ब्रेकिंग! प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करुन घरी परत जात असताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..