मंगळवेढा-पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना काही दिवसापूर्वी कोरोनो लागण असल्याने ते सध्या पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उपचार दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृती मध्ये सुधारणा होत आहे.
त्यांची तब्बेत उत्तम होवून जनतेचे सेवेसाठी पुन्हा नवीन जोमाने कामाला लागून सामान्य जनतेला सहकार्य करून कामाला नवीन दिशा देणेसाठीच आमदार भारत भालके यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी मंगळवेढा शहरातील भालके प्रेमींनी मंगळवेढ्याचे आराध्य दैवत जय भवानी देवीची पूजा करून गैबीसाहेब दर्गा येथे चादर चढवून मारूती मंदिरात पुजा करून आमदार भारत भालके यांचा निरोगी जीवनासाठी प्रार्थना केली.
यावेळी मंगळवेढा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मारुती वाकडे,मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजम्मील काझी, सार्वजनिक शिवजयंतीचे माजी अध्यक्ष राहुल वाकडे,प्रविण भोसले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष हर्षद डोरले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे माजी अध्यक्ष विक्रम शेंबडे, गणेश धोत्रे,चंद्रकांत काकडे , किरण घोडके , किरण घुले , अजित घुले , विनायक हजारे , शुभम सावंत , चंद्रकांत जाधव युवराज वाकडे , अर्जुन देवकर असे अनेक भालके प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आमदार भारत भालके यांना लवकर कोरोना मुक्त करून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी मतदारसंघात कामास सुरुवात करण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात प्रार्थना केली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज