मंगळवेढा टाईम्स न्युज ।
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीता खडाखडे यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी जाहीर केला.
खडाखडे या २०२२ मध्ये सरपंच पदाच्या थेट निवडणुकीमध्ये अनुसूचीत जमाती या जागेवरुन निवडून आल्या होत्या. सरपंच सीता खडाखडे मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे कारण देवून अॅड. शरद पाटील यांनी वांगी येथील रहिवासी धरेप्पा खडाखडे यांच्यावतीने तक्रार दाखल केली होती.
त्यावर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. त्यात अॅड. पाटील यांनी युक्तिवाद केला की, वांगीच्या सरपंच खडाखडे यांचा जातीचा दाखला अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे विभागाने अवैध घोषित केला आहे.
अनुसूचीत जमातीचे असल्याबाबतचे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी.
युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सीता खडाखडे यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे घोषित केले. यात विवाद अर्जदार तर्फे अॅड. शरद पाटील, अॅड. प्रसाद काशिद यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज