टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, नारायणा ॲक्वा स्विम हे स्विमिंग पूल बुधवारपासून नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती संचालक महादेव भगत यांनी दिली आहे.
पंढरपूर रोड आयटीआय कॉलेज समोर बुधवार दि.1 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंखे सर हे असणार आहेत.
मंगळवेढा शहरात सुसज्ज असे स्विमिंग पूल नसल्यामुळे अनेक नागरिकांना पोहण्यासाठी बाहेरगावी जावे लागत होते, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठी खूप कसरत करावी लागत होती आता ही सर्व अडचण दूर झाली असून नारायणा ॲक्वा स्विम यांनी एकाच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
नागरिकांच्या सोयीनुसार दैनिक, मासिक, वार्षिक पास सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांसाठी पोहण्याचे ट्रेनिंग देखील यामध्ये दिले जाणार आहे.
महिलांसाठी स्वतंत्र बॅच सुरु असून महिलांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी यामध्ये घेतली जाणार आहे.
कुटुंब व ग्रुपसाठी सवलतीच्या दरामध्ये पॅकेज उपलब्ध करून देण्यात येणार असून कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रशस्त सुंदर व्यवस्था देखील येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
नैसर्गिक वातावरणात अत्याधुनिक असा स्विमिंग पूल मंगळवेढेकरांसाठी बुधवारपासून सुरू होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान येताळा भगत सर, जयंत पवार सर, अशोक भगत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
स्विमिंग पूल संदर्भातील अधिक माहितीसाठी 9923493869 , 9421444460 , 9890362132 , 9730153869 या नंबर वरती संपर्क साधावा.
सदर कार्यक्रमाप्रसंगी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, शिवसेना उपनेते शरद कोळी, आ.राजू खरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, आंतरराष्ट्रीय जलपट्टू सुयश जाधव, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित बापू कदम, उद्योजक वैभव नागणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, सरपंच शिवाजी सरगर,
जकराया शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन जाधव, पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज