टीम मंगळवेढा टाईम्स । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना एका भामट्याने पंढरपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या भामट्यापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन किरण अवचर यांनी केले आहे.
पोलीस अधिकार्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैसे मागण्याचा प्रकार पंढरपूरमध्ये घडत आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी माझे अकाऊंट हॅक झाले आहे, कोणी पैसे मागितले तर पाठवू नका असे आवाहन केले आहे.
मागील महिन्याभराच्या कालावधीमध्ये शहरातील विविध भागातील नागरिकांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.
त्या फेसबुक अकाऊंट वरून अश्लील शिवीगाळ करण्यात येत आहे. या पीडित लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज देखील केला आहे. तक्रारी अर्ज येतातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सायबर सेल कळविले आहे.
पोलिस कार्यालयातील सायबर पोलिस स्टेशनला वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. त्यात बनावट फेसबूक अकाउंटच्या सहाय्याने फसवणूक केल्याचा अनेक तक्रारी आहेत. पूर्वी आठवड्यातून एखादी, दुसरी तक्रार येत होती. परंतु गेल्या महिन्यांपासून दररोज फेसबूक अकाउंट हॅक केल्याच्या तक्रारी येत आहेत.
फेसबूक अकाउंटचा पासवर्ड स्वतःचे नाव, आपला वापरात असलेल्या मोबाइल नंबर, गाडी नंबर, जन्मतारीख असे ठेवणाऱ्यांबाबत हा प्रकार घडत आहे. फेसबूक अकाउंट हॅक होऊ नये म्हणून अल्फान्युमेरिक पासवर्ड ठेवावा, जुने पासवर्ड बदलून दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनने नागरिकांना केले आहे.
त्याचबरोबर मोबाइल फोनवर अथवा कॉम्प्युटरवर फेसबूक अकाउंट चालू करताना स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड कोणाला दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी, मित्र, मैत्रिणीला आपले फेसबूक वापरण्यास देऊ नये व पासवर्ड शेअर करू नये, अशा दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
दुसऱ्याचे नावाने फेक फेसबूक अकाउंट तयार करणे हा माहिती तंत्रज्ञाना कायद्यांतर्गत गुन्हा आहे. आपली वैयक्तिक माहिती घरचा पत्ता, फॅमिली फोटो, शाळेचे नाव इत्यादी फेसबूकरव कोणाला शेअर करू नका,’ असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनने केले आहे.
माझ्या फेसबुक अकाऊंट हॅक करून डमी अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर मेसेंजरचा उपयोग करून माझ्या जवळच्या मित्रांना पेटीएम द्वारे पैसे मागण्याचा प्रयत्न होत आहे. तरी कोणाला असा मेसेज आला तर फोनवरून खात्री करा. असा प्रकार इतरांशी घडू नये यासाठी त्यांनी त्यांचे फेसबुक प्रोफाईल ब्लॉक करून ठेवावेत. – किरण अवचर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर
Pandharpur city police officer kiran avachar Facebook account hacked
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज