टीम मंगळवेढा टाइम्स ।
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतून तुम्हाला उमेदवारी द्यायला आम्ही तयार आहोत, ‘तुम्ही आमच्याकडून लढा’ सध्या आमच्याकडे तिकीट मागणारा मध्ये काहीजण गट टिकवण्याच्या तर काहीजण गट वाढवण्याच्या कामासाठी आमदारकीच्या तिकिटाची मागणी करत आहेत.
पण तुम्ही मतदार संघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करत आहात, त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी ऑफर महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याने दिली असल्याचा खळबळजनक खुलासा आमदार समाधान अवताडे यांनी केला आहे.
ही ऑफर आपण नाकारल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मंगळवेढा येथे सोशल मीडियात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी हितगुज साधताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
ज्या पक्षाने मागितल्यापेक्षाही जादा दिले आहे, त्या पक्षाला मी सोडणार नाही, मी नवखा उमेदवार असतानाही मागेल तेवढा निधी देऊन माझ्या मतदारसंघात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवले,
पंढरपूर एमआयडीसी, मंगळवेढा उपसा सिंचन योजना या प्रश्नावर वर्षानुवर्ष राजकारण करत आमदारकी मिळवलेल्या लोकांनी पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र त्या प्रश्नांची सोडवणूक माझ्या मागणीनंतर महायुती सरकारने केली असून का म्हणून मी माझ्या पक्षाला सोडून तुमच्याकडे येऊ असा प्रति प्रश्न मी त्यांना केला असल्याचेही आवताडेंनी सांगितले.
मी निवडून आल्यानंतर पक्ष पार्टी गट तट न पाहता जो माझ्याकडे काम घेऊन येईल त्याचे कामच केले आहे. मतदारसंघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिवस रात्र मी मतदार संघाच्या विकासासाठी एक केला आहे.
माझ्या पक्षाने दिलेल्या भरघोस निधीमुळे मी रखडलेली कामे मार्गी लावू शकलो. मला कधीही एकटे सोडणार नाहीत याची मला खात्री आहे असेही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज