टीम मंगळवेढा टाईम्स।
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंसोबत मी यापूर्वी काम केले आहे. मात्र, गैरसमजुतीमधून काही गोष्टी घडल्या. आता एकमेकांना डिस्टर्ब न करता काम करणार आहे.
तसेच उमेश पाटलांच्या नरखेड येथील कार्यक्रमाला प्रकृतीच्या कारणावरून गेलो नाही. मात्र, येणाऱ्या काळात तिथे कार्यक्रम घेणार आहे, अशी स्पष्टोक्ती माजी आमदार रमेश कदम यांनी दिली.
मोहोळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते, पुढे बोलताना म्हणाले की, मोहोळच्या काही भागावर विकास निधीबाबत अन्याय झाल्याची जनतेची भावना आहे.
यावर चर्चा करून लवकरच राजकीय भूमिका घेण्यात येईल. मनोहर डोंगरे, बळीराम साठे, रमेश बारसकर यांच्यासह अनेक पक्षातील नेत्यांनी माझी भेट घेत तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही विधानसभेसाठी जागा सोडण्यासाठी पक्षाला विनंती करू, असे म्हणाले.
मात्र, मी राजकीय भूमिका घ्यायची तेव्हा घेईन. माझ्या राजकीय जीवनात या नेत्यांचे मार्गदर्शन उपयोगी येईल, असेही रमेश कदम यांनी सांगितले.
पंढरपूर विभागातील १७ गावांतील रस्ते अत्यंत खराब झाले असून, ‘आधी रस्ते मग वाळू’ या भूमिकेवर अजूनही ठाम असून, यासह तिर्हेमार्गे पंढरपूर आणि छोट्या-मोठ्या गावांतील रस्ते यासाठी आंदोलन करावे लागले तर ते करणार आहे, असेही ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज