टीम मंगळवेढा टाईम्स।
यंदाच्या पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी साडेतीन महिने संपत आले तरीही सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता. मात्र रविवारी रात्री वरुण राजाने मनसोक्त हजेरी लावत दिलखुलास बरसात केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
आजपर्यंतच्या इतर नक्षत्रांनी घात केला, पण हस्त नक्षत्राने हात दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
सुरुवातीचा जून महिना कोरडाच गेला. तद्नंतर ऑगस्ट महिन्यातही पाऊस रुसलेलाच. ऑगस्टचे ३० दिवस आणि सप्टेंबरचे १९ दिवस असा सलग ४९ दिवस सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडलाच नाही.
१९ सप्टेंबरला गणेश आगमनाबरोबर वरुण राजाचे आगमन झाले. जून कोरडा गेल्यानंतर ३ जुलै रोजी सोलापूर शहरात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
तद्नंतर पावसाने दडी मारली. यंदाच्या हंगामामध्ये रविवारी रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत ४९ मिलिमीटर पाऊस पडला. तर दिवसभर आठ मिलिमीटर पाऊस पडला. एकूण रविवारच्या २४ तासांमध्ये ५७ मिलिमीटर पाऊस पडला.
या हंगामामध्ये पडलेला हा दुसरा मोठा पाऊस आहे. हस्त नक्षत्राच्या या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सालाबादप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये १७६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते.
यावर्षी प्रत्यक्षात १३९ मिलिमीटर म्हणजे ७९ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये व तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचे हे प्रमाण कमी जास्त आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी ४८१.१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. त्यामध्ये आजपर्यंत पडलेला पाऊस फक्त ३८६ मिलिमीटर म्हणजे ७६.५ टक्केच पडलेला आहे.
परतीचा पाऊस संपत आला असे जरी सांगितले जात असले तरी, हवामान खात्याने दोन ऑक्टोबरपर्यंत सोलापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला होता. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील ४८ ते ७२ तास पावसाचा मुक्काम राहणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूरसह कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.
उजनीचाही टक्का वाढला
सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणामध्ये १९ सप्टेंबरपर्यंत फक्त २४.२३ टक्के पाणीसाठा होता. त्यामधूनही सोलापूर शहराला पिण्यासाठी साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन झाले होते. १९ सप्टेंबरला सुरू झालेल्या पावसामुळे दोन ऑक्टोबरपर्यंत धरण प्लस ४५ टक्के भरले आहे. ते पन्नाशी पार केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज