mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! आता दुबार, विभक्त, नावे कमी करणे, वाढविणे, नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही; ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत मिळणार रेशनकार्ड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 7, 2023
in सोलापूर
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

टीम मंगळवेढा टाईम्स। 

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाइन रेशनकार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बनावटगिरीलाही चाप बसला आहे.

रेशनकार्डसाठी एजंटांकडे पैसे व कागदपत्रे दिली, पण महिन्यानंतरही शिधापत्रिका मिळालीच नाही, अशा तक्रारींना आता कायमचा पूर्णविराम लागणार आहे.

आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाइन सुविधा केंद्रांवर जाऊन अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत. ५० ते १०० रुपयांच्या शुल्कात त्यासाठी अर्ज ऑनलाइन अपलोड केला जाईल.

त्यानंतर अवघ्या ३० दिवसांत संबंधित व्यक्तीला रेशनकार्ड मिळणार आहे. त्यामध्ये दुबार किंवा विभक्त रेशनकार्ड, त्यातील नावे कमी करणे किंवा नावे वाढविणे, नवीन रेशनकार्ड काढण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी येईल. त्यानंतर त्या लाभार्थीला रेशनकार्ड मिळणार आहे. कोणत्याही एजंटांकडे जाऊन त्याला पैसे देण्याची गरज या सुविधेमुळे राहिलेली नाही.

नागरिकांना आता शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या त्यांना शिधापत्रिका मिळणार आहे.

संकेतस्थळावरुन करता येईल अर्ज

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता गावातील, शहरातील प्रत्येक नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका मिळणार आहे. त्यासाठी त्यांना जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन www.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा आधार क्रमांक आता लिंक करण्यात आला आहे. अंतोदय योजनेतील कुटुंबाला दरमहा ३५ किलो तर प्राधान्य कुटुंबाला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. केंद्र व राज्य सरकारने हे प्रमाण निश्चित केले आहे.

दरम्यान, कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक केल्यास धान्य घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळातच त्यासंबंधीचा मराठीतून मेसेज मोबाईलवर येणार आहे. त्यातून धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी कमी होतील, असा विश्वास विभागाला आहे.

३० दिवसांत मिळेल रेशनकार्ड

शिधापत्रिका काढण्यासाठी आता कोणाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन सुविधा केंद्रावरून अर्ज केल्यास ३० दिवसांत त्या व्यक्तीला नवीन रेशनकार्ड किंवा विभक्त रेशनकार्ड मिळणार आहे.- मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा

अर्जासाठी ‘ही’ कागदपत्रे लागतात

उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला (सातबारा उतारा, लाईट बिल), आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे), शेजारचे रेशनकार्ड झेरॉक्स स्वाक्षरी, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रेशनकार्ड ऑनलाइन

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 3, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ७ तालुक्यांचे भाग्य बदलणार?

June 30, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

मोठी बातमी! सदगुरू बैठकीसाठी जात असताना दुचाकीला टेंम्पोने उडवले, पत्नीचा जागीच मृत्यू तर पती जखमी; मंगळवेढा शहरातील घटना

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 5, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा