mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ज्येष्ठांनो! ३ हजार हवेत, ‘या’ ठिकाणी करा अर्ज; सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 13, 2024
in राज्य, शैक्षणिक
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्य शासनाकडून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकरकमी आर्थिक साहाय्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त समितीचे अध्यक्ष

या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभाथ्यर्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बैंक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेखीच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

योजनेतून ही खरेदी करा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर या गोष्टी खरेदी करता येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे.

आवश्यक कागदपत्रे

■ आधारकार्ड, मतदान कार्ड, ■ बँक पासबुकची झेरॉक्स, ■ पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, ■ स्वयं-घोषणापत्र, ■ अन्य विहित नमुन्याचे कागदपत्र

काय म्हणतात अधिकारी?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्य सरकार राबवत आहे, त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया ही सारखीच असणार आहे. योजनेसंबंधी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही जनजागृती, प्रचार, प्रसार करू.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जेष्ठांना निधी

संबंधित बातम्या

माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर; कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा; आ.आवताडे यांच्या प्रयत्नाला यश

Breaking! मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर; कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा; आ.आवताडे यांच्या प्रयत्नाला यश

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा