मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
वृद्ध माता-पित्यांचा सांभाळ न करता त्यांना दुर्लक्षित करण्याचे प्रकार अलीकडे अनेकदा दिसताहेत. अशाच प्रकारची कैफियत जन्मदात्या आईनं आपला मुलगा आणि सुनेविरुद्ध पोलिस ठाण्यात दिली आहे.
मुलगा आपला सांभाळ करीत नाही, मारहाण करतो, ठार मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद शुक्रवारी विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंदली गेली.
अजुमआरा इसाक शेख (वय ६८, रा. ३२८, लोकमान्य नगर, मजरेवाडी, सोलापूर) असे फिर्यादी आईचे नाव असून, पोलिसांनी तातडीने दखल घेत फिर्यादी वयोवृद्ध आईचा मुलगा
इरशाद इसाक शेख व सून महजबीन इरशाद शेख (रा. लोकमान्यनगर, मजरेवाडी, सोलापूर) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२) ३५२,३५१ (२),३ (५), ज्येष्ठ नागरिक आणि पालक पोषण आणि कल्याण अधिनियम कलम २४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांचे पती इसाक शेख हे शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात फिर्यादी यांना फॅमिली पेन्शन मिळायची. नोव्हेंबर २०२४ पासून फिर्यादीचा मुलगा इरशाद वृद्ध आईचा व्यवस्थित सांभाळ करत नसे.
फिर्यादीकडून पेन्शनची रक्कम न दिल्याच्या कारणावरून तो आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण करायचा. जिवे ठार मारण्याची धमकीही देऊन शारीरिक व मानसिक छळ करायचा. या कृत्यात सुनेचाही फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.
विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी तातडीने दखल घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि पालन पोषण आणि कल्याण अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश देऊन हवालदार जी. एस. मणुरे यांच्याकडे तपास दिला आहे.
मुलगा-सुनेला बोलावून समज देणार
याप्रकरणी संबंधित फिर्यादीचा सांभाळ न करणाऱ्या मुलगा आणि सुनेला शनिवारी बोलावण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहू शकले नाही. उद्या पोलिसांकरवी बोलावून समज देण्यात येईल.
जन्मदात्या माता-पित्यांची हेळसांड होत असल्यास कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी बोलताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज