टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी केले.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या अनुषंगाने त्यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
दिलीप धोत्रे म्हणाले, पंढरपूर, मंगळवेढा यासारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर मात्र त्यांना नोकरीसाठी शहराकडे जावे लागते. नोकरीतून मिळणारा पगार आणि शहरातील खर्च यांचा मेळ घालण्यातच त्यांचे आयुष्य खर्ची पडते.
दोन्ही तालुक्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी आमदारकी भोगली त्या लोकांनी या बेरोजगारांचा विचार केला नाही. वास्तविक पाहता इथे नोकऱ्या निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते. पंढरपूर येथे एम आय डी सी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.
परंतू केवळ सत्ताधाऱ्यांची उदासीनता असल्या कारणाने तो प्रश्न मार्गी लागला नाही. मनसेच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा शहरासाठी नवीन उदयोजक निर्माण करणे, मोठ्या उदयोजकांना येथे कारखाने सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नोकऱ्या निर्माण
करण्याचे आमचे ध्येय आहे. राज ठाकरे यांच्या माध्यमातून उदयोजक या ठिकाणी उदयोग काढण्यास प्रोत्साहित ठेवतील. पंढरपूर सोलापूर येथे ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन असून रस्तेही चांगले झाले आहेत. हे सर्व रस्ते सर्व राज्यांना जोडले गेलेले आहेत. त्यामुळे नवीन उदयोग निर्माण होण्यास काही हरकत नाही.
शेतकऱ्यांसाठी दिवसा विज पुरवठा होणे गरजेचे आहे. सरकारची केवळ उदासीनता असल्या कारण्याने येथे उदयोग उभा राहू शकत नाहीत. आम्ही समाजकारणातून राजकारण करतो.
पण ते राजकारण केवळ विकासासाठी असेल. पंढरपूर नगरपालिका असू दया किंवा पंचायत समिती असू दया या ठिकाणी समांतर पध्दतीने आम्ही राजकारण केले. आत्तापर्यंत सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांचा अनुभव मतदारांनी घेतला आहे. स्वाभिमानी असे राज ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याचा उद्देश आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हा समन्वयक नारायण गोवे, महिला जिल्हाध्यक्षा भारती चौगुले, मंगळवेढा तालुकाध्यक्ष शंकर गांडुळे, तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार, शहराध्यक्ष राजवीर हजारे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत पवार, आस्थापना अध्यक्ष मारुती वाघमारे,
शेतकरी सेना जिल्हा सचिव प्रविण कोंडुभैरी, वाहतुक सेना शहराध्यक्ष कृष्णा ओमने, सह सेना जिल्हा उपाध्यक्ष तेजस शिंदे, शाखाध्यक्ष हेमंत पवार, गणेश पिंपळनेरकर, माजी सैनिक दयानंद गायकवाड, महादेव दिवसे यांचेसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत दिलीप धोत्रे
दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दिलीप धोत्रे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून ते मूळ शिवसैनिक आहेत.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला, उत्तम संघटन कौशल्य असल्याने शिवसेना ते मनसे असा त्यांचा प्रवास चढत्या क्रमाने झाला. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता.
धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता.
सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी मनसेमध्ये पार पाडली आहे. त्यानंतर, नुकेतच त्यांना पक्षात नेतेपदही देण्यात आले आहे.
2009 साली दिलीप धोत्रेंनी विधानसभा लढवली
दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते, नंतरच्या काळात धोत्रे यांनी कामगार शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नावर अनेकवेळा आवाज उठवत आंदोलने केली.
कोविडच्या काळातही त्यांनी मोठे काम केल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांचा मोठा मतदार वर्ग तयार झालेला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राज ठाकरेंनी त्यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज