मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
आज गुरुवारपासून मतदारसंघातील प्रत्येक गावाला ते भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे.
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गावातील घरकुल योजना, कृषी, पीककर्ज, विकासकामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदी बाबींचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्यात तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर गावात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित असतील.
माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे हे ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देणार आहेत.
असा असेल दौरा
आज गुरुवार, दिनांक २१ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता देगांव, ४.३० वाजता शरदनगर, ५.०० वाजता ढवळस आणि ५.३० वाजता धर्मगांव असा कार्यक्रम असणार आहे.
शुक्रवार, दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता मुंढेवाडी, ८.३० वाजता रहाटेवाडी, ९.३० वाजता बोराळे, १०.०० वाजता नंदुर, १०.३० वाजता अरळी, ११.०० वाजता सिद्धापूर, ११.३० वाजता तांडोर, दुपारी १२.०० वाजता तामदर्डी, १२.३० वाजता माचणूर, १.०० वाजता ब्रम्हपूरी, १.३० वाजता बठाण आणि २.०० वाजता उचेठाण असा कार्यक्रम असणार आहे.
शनिवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता घरनिकी, ८.३० वाजता मारापूर, ९.३० वाजता गुंजेगाव, १०.०० वाजता महमदाबाद (शे), १०.३० वाजता लक्ष्मीदहिवडी, ११.०० वाजता लेंडवे चिंचाळे, ११.३० वाजता आंधळगाव, दुपारी १२.०० वाजता गणेशवाडी, १२.३० वाजता शेलेवाडी, १.०० वाजता अकोला,१.३० वाजता कचरेवाडी आणि २.०० डोंगरगाव येथे दौरा नियोजित आहे.
लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा प्रयत्न
कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात, या उद्देशाने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. – प्रशांत परिचारक, मा.आमदार,
कोणत्याही परिस्थितीत लोकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहणार : आ.आवताडे
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम तत्पर असून, आता रोज एका-एका गावात जावून तेथील प्रश्न समजावून घेतले जाणार आहेत. अनेक प्रश्न तेथेच सोडविण्याचा प्रयत्न असेल.
रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कामे केली जातील असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
सदर गावभेट दौऱ्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांच्यासमवेत तालुका पातळीवररील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सदरील गावातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी आपल्या अडी – अडचणी व समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज