टीम मंगळवेढा टाईम्स।
कर्जाच्या पैशाच्या बदल्यात कर्जदारास शरीरसुख द्यावे लागेल, असे म्हणत त्याला विरोध केला म्हणून २९ वर्षाच्या विवाहितेला पती व सासू यांनी अंगावरील सर्व कपडे काढून तिला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणात पती, सासू, सासरे यांच्यासह सात संशयिताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी विवाहित ही शिवाजीनगर भागातील आहे.
करमाळा पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा विवाह २०१८ मध्ये करमाळ्यातील एका बड्या घरातील मुलाशी झाला होता. फिर्यादी सासरी करमाळा येथे नांदण्यासाठी आली.
त्यानंतर एक वर्षानंतर तिला मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. उपाशी पोटी ठेवून वडिलांकडून सात लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून त्रास सुरू केला.
तेव्हा फिर्यादीच्या वडिलांनी सात लाख रुपये आणून दिले. नवरा वारंवार शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्कीने मारहाण करत होता. २०२१ मध्ये फिर्यादी पुन्हा प्रेग्नेंट राहिली. साधारण दोन महिन्याची गरोदर असताना नवऱ्याने दारूच्या नशेत तिला हे बाळ ठेवायचे नाही
व घरच्यांना देखील हे बाळ नको आहे, असे म्हणून भांडण करून तिला मारहाण केली. तिच्या पोटावर लाथा मारल्यामुळे बाळ पोटातच मरण पावले. त्यात तिला त्रास होऊन रक्तस्राव झाला.
त्यानंतर करमाळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. संमतीशिवाय गर्भ खाली केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यापुढे फिर्यादीत म्हटले आहे की, काही दिवसांनी पतीच्या दुकानातील एका कामगाराने असेही फिर्यादीत म्हटले आहे.
करमाळा येथील एकाकडून कर्ज काढून दिले होते. ते कर्ज फेडण्यासाठी कामगाराला रात्री-अपरात्री पाठवत होते. तो कामगार धमकी देत होता.
‘घरावर जप्ती आणली जाईल, घर खाली करावे लागेल, घर वाचवायचे असेल तर कर्जाचे पैसे द्यायचे नसतील तर मी म्हणेल ते ऐकावे लागेल’, असे म्हणत. व पती, सासू पैशाच्या बदल्यात कर्जदारास शरीरसुख द्यावे लागेल, असे सांगत होते.
मी त्याच्या या प्रकारास विरोध केला तेव्हा पती व सासू यांनी माझ्या अंगावरील सर्व कपडे काढले व रात्रभर काठीने मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तू जर माहेरी काही सांगितले तर तुझ्या एकुलत्या एक मुलाचा खून करीन, अशी धमकीही दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज