टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत दामाजीच्या पुतळ्याची व परिसराची झालेली दुरावस्था व पर्यायाने नगरपालिकेसहित इतर सर्वांचेच झालेले दुर्लक्ष झालेले आहे हे निष्पन्न असून अपूर्ण सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे अन्यथा आम्हास परवानगी द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात मंगळवेढा ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच शिवछत्रपतींचा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मंगळवेढ्याला एक ऐतिहासिक वारसा देखील आहे.
चालुक्य सम्राट मंगलेशाचा नावावरून मंगळवेढा हे नाव झाले आसण्याची शक्यता आहे. मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. मातीच्या ढिगारा खाली दबले आसताना देखील शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठलाचे नामस्मरण करणारे संत चोखामेळा,
लोकरंजन करणारी पण स्वःताचे पावित्र्य जपणारी कान्होपात्रा, सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हजरत अली गैबीपीर अशा थोर व्यक्ती मंगळवेढ्यात होऊन गेल्या आणि त्यातून निर्माण झाले सिद्धेश्वराचे मंदिर एकवीरा देवीचे मंदिर , हजरत पीर गैबीसाहेब यांचा दर्गा आशी मंगळवेढ्यातील श्रद्धास्थाने.
संत चोखामेळा त्यांची पत्नी सोयरा, मेव्हुना बंका, संत कान्होपात्रा ,सिताराम महाराज अशा संतांची मांदियाळी मंगळवेढ्यातीलच. महात्मा बसवेश्वर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवणारे श्री जयतीर्थ टिकाचार्य आशी थोर व्यक्तिमत्त्व मंगळवेढा भूमीतीलच.
लतीफबुवा, सिताराम महाराज खर्डीकर,मौनीबुवा,गोपाबाई,संत गोविंद बुवा, संत वडारी महाराज, संत बागडे बाबा , संत बाबा महाराज आर्वीकर, श्री स्वामी समर्थ आशा अनेकांच्या वास्तवाने, कर्माने ,वाणीने संस्कारमय झालेली ही भूमी.
आशा या संताच्या भूमीत श्री संत दामाजीच्या पुतळ्याची व परिसराची झालेली दुरावस्था व पर्यायाने नगरपालिकेसहित इतर सर्वांचेच झालेले दुर्लक्ष झालेले आहे हे निष्पन्न झाले.
दामाजीपंतांची कथा प्रसिद्ध आहे. ते बिदरच्या महंमद शहाच्या दरबारात सेनापती होते (1300 ते 1382). त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांच्या कारकिर्दीत 1378 साली भीषण दुष्काळ पडला.
लोक अन्नधान्यासाठी तडफडू लागले त्यामुळे दामाजी यांनी महंमद शहाच्या कोठारातील अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाकले. दामाजी यांना अटक करण्यात आली.
दामाजी यांच्या सुटकेसाठी पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठुमहार या नोकराचे नाव धारण करून दामाजीपंतांची सुटका केली!
आशा या दामाजीच्या पुतळ्याकडे झालेल्या दुर्लक्षते बाबतीत वृत्तवाहिन्यांवर स्थानिक आमदार व नगरपालिकेला लक्ष्य केले असता.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कोरोना काळामुळे निधीची कमतरता असल्याचे सांगितले. खरे पहाता जे संत मंगळवेढ्याची अस्मिता आहेत व आज पर्यंत मंगळवेढ्या-पंढरपूरचे सर्वच लोकप्रतिनिधीनी विधानसभेत आमदारकीची शपता घेताना याच संताचा दाखला देतात. आशा संताच्या कामासंदर्भात निधीच्या कमतरतेचे कारण सांगणे म्हणजे संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचा अपमान व दुर्दैव आहे.
म्हणूनच जर निधीची कमतरताच असेल तर मी स्वःखर्चातुन किंवा लोकसहभागातून या साठी आवश्यक तो निधी उभा करून रखडलेले सुशोभिकरणाचे काम मार्गी लावण्यास तयार आहे.
संबधित पुतळ्याचे अधिकार हे नगरपालिकेकडे आसल्याने त्या आशयाचा लेखी पत्र व्यवहार मी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांना करून त्या सुशोभीकरण संबधीत परवानगी मागीतली आहे.
एक तर हे अपूर्ण सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे अन्यथा आम्हास परवानगी द्यावी थोड्याच कालावधीत ते काम मार्गी लावू.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज