टीम मंगळवेढा टाईम्स ।
भरधाव वेगाने निघालेल्या पिक अपने दुचाकीस्वारास जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील शंतनू भगरे हे मयत झाले असून पाठीमागे असलेले दिनेश कोळी हे गंभीर जखमी झाल्याची घटना पाटखळ नजीक घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , शंतनू तुळशीराम भगरे (वय ४७ रा.भोसे) व दिनेश कोळी हे शुक्रवार दि.९ जुलै रोजी खुपसंगी ते पाटखळ रोडने एम एच १३ सी.जी.५१५२ या बुलेटवरून येत असताना पाटखळ गावाच्या शिवारातील सिध्दनाथ मंदिराच्या पुढे असणाऱ्या रामचंद्र क्षिरसागर यांच्या शेताजवळील रोडवरून जाताना
पाटखळकडून खुपसंगीकडे जाणारी एमएच १४ ई एम ५२८४ या पिक अपचा चालक पांडुरंग सुभाष (रा.जुनोनी) याने आपल्या ताब्यातील पिक अप भरधाव वेगाने चालवून जोराची धडक दिली.
त्यात शंतनू भगरे हे मरण पावले. तर दिनेश कोळी हे गंभीर जखमी झाले.दोन्ही वाहनांची मोडतोड होवून २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दाखल करण्यात आल्याने आरोपी पिकअप चालकाविरूध्द भा.दं.वि.सं.कलम २७९ , ३०४ अ, ३३७,३३८,४२७ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार नागप्पा निंबाळे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज